भोकरदन नाका परिसरातून पिकअप चोरणारे ०४ आरोपीत जेरबंद, रु. ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

भोकरदन नाका परिसरातून पिकअप चोरणारे ०४ आरोपीत जेरबंद, रु. ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना, ३ जून २०२५: जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि फुलंब्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भोकरदन नाका परिसरातून अशोक लेलँड पिकअप चोरणाऱ्या चार आरोपीतांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला रु. ४,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे २०२५ रोजी शेख मुजाहेद शेख हनीफ (वय २९, रा. संभाजीनगर, जि. जालना) यांच्या मालकीची अशोक लेलँड दोस्त एलई लोडिंग गाडी (क्र. MH13AX9409) आणि त्यातील पार्सल चोरीला गेल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जालना पोलीस अधीक्षकांनी सूचना दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले. गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन नाका येथील सराईत आरोपीत शेख आरेफ शेख साबेर याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे समोर आले.
या माहितीच्या आधारे, 2 जून 2025 रोजी शेख आरेफ शेख साबेर याची चौकशी करत असताना, फुलंब्री येथील पोलीस अंमलदार श्री. पाचगे आणि श्री. कणसे यांनी गुन्ह्यातील अशोक लेलँड दोस्त पिकअप मिळून आल्याची माहिती दिली. तात्काळ पथक फुलंब्री येथे रवाना झाले आणि पिकअप घेऊन जाणारे आरोपीत शेख फारुख शेख नब्बु (वय ३१, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि शेख समीर शेख रज्जाक (वय २९, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री, जि.छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांनी हा गुन्हा त्यांचे जालना येथील साथीदार शेख आरेफ शेख साबेर (रा. तोतला पेट्रोलपंप शेजारी, भोकरदन नाका, जालना) आणि शेख अल्तमश शेख निसार (रा. तोतला पेट्रोलपंप शेजारी, भोकरदन नाका, जालना) यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. आरोपीतांकडून चोरीला गेलेला पिकअप जप्त करण्यात आला आहे.
या कारवाई दरम्यान, आरोपीत शेख समीर शेख रज्जाक (वय २९, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री, जि.छत्रपती संभाजीनगर) हा सराईत चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीतील आयशर चोरी केल्याची कबुली दिली.
याशिवाय, शेख समीर शेख रज्जाक याने २१ मार्च २०२५ रोजी सिद्धी विनायक गणपती मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर येथून महिंद्रा बोलेरो पिकअप चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्याची नोंद जवाहरनगर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे गु.र.क्र. १०७/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहा. पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, सागर बाविस्कर, मपोकों/रेणुका बांडे (सर्व स्था.गु.शा. जालना) आणि फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गोरखनाथ कणसे, अनंत पाचंगे यांनी पार पाडली.