माजी सैनिक आणि अवलंबीतांना ३० मेपर्यत नोंदणी करण्याचे आवाहन
By देवानंद बोर्डे

माजी सैनिक आणि अवलंबीतांना ३० मेपर्यत नोंदणी करण्याचे आवाहन
जालना, दि.२८: सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्य ज्यांची जिल्हा सैनिक कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्यांचे महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे याच्यांमार्फत सर्व डेटा डीजीटलाइझेशन तसेच संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्य यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कोणत्याही सेवेचा लाभ घेण्याकरिता www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ३० मे, २०२५ पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. याकरिता १०० रूपये फी आकारणे बंद करण्यात आलेली आहे. याकरिता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त माजी सैनिकांचे आणि विधवा पत्नींचे जिल्हा सैनिक कार्यालयात मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक उपलब्ध नाहीत अशा सर्वानी आपला मोबाईल क्रमांकासह आधार क्रमांक नावासहित ९२८४३९१६६० या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. तसेच वरील संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेला फॉर्म देखील या कार्यालयास सादर करावा. अथवा जिल्हा सैनिक कार्यालय, जालना येथे दि. ३० मे, २०२५ पर्यंत जमा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.