जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद
By देवानंद बोर्डे

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद
जालना, दि. 30: जालना महानगरपालिकेस शासना मार्फत कायद्यात आवश्यक बदल करून पुढील 5 वर्षा करिता जीएसटी अनुदान 392 कोटी मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यांत आला.
याप्रसंगी मा.आयुक्त तथा प्रशासक श्री संतोष खांडेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि वरिष्ठ लिपीक श्री आंनद मोहीदे व श्री गणेश बत्तीन यांनी GST प्रस्ताव तयार करण्याकरिता परिश्रम घेतले आहे. त्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.आयुक्त तथा प्रशासक श्री संतोष खांडेकर यांनी परभणी आणि लातूर महापालिका याचे पेक्षा जालना महापालिकेस GST अनुदान जास्त मंजूर झालेले आहे. जालना शहर हे स्टील हब, कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक मोठी बाजारपेठ आहे, शहरातील सीड उद्योग, कपडा मार्केट, लॉजिस्टिक्स पार्क, ड्राय पोर्ट तसेच विविध उद्योग व व्यापाराचे अनुषंगाने शहरातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भरण्यात येणाऱ्या GST च्या अनुषंगाने सदरील अनुदान कमी मंजूर झालेले असून महापालिकेस जवळपास 12 ते 15 कोटी GST अनुदान मंजूर होणे अपेक्षित आहे.
यावेळी मुख्यलेखाधिकारी तुकाराम भिसे, मुख्यलेखपरीक्षक प्रविण निंबाळकर, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, शहर अभियंता सऊद, नगर अभियंता विद्युत कोमल गावंडे,कार्यालय अधीक्षक विजय फुलंब्रीकर, कर अधीक्षक राजेश कुरलीये आणि कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.