D9 News इम्पॅक्ट: पारधमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई, लाखोंचा आंबा जप्त
By तेजराव दांडगे

D9 News इम्पॅक्ट: पारधमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई, लाखोंचा आंबा जप्त
पारध, दि. 18: D9 न्यूजने अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. नियतक्षेत्र भोकरदनमध्ये गस्तीवर असताना आज दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी मौजे पारध बुद्रुक परिसरात अवैध वृक्षतोड होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे भोकरदन तालुक्यातील मौजे पारध ते धामणगाव रोडवर तपासणी केली असता, या ठिकाणी अवैधपणे आंबा वृक्षांची तोड करून त्याची साठवणूक केल्याचे उघडकीस आले.
वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैधपणे तोडलेले १७ नग आंबा गोलनग जातीचे वृक्ष आढळून आले. याप्रकरणी कलीम करीम शहा, वय ४५ वर्षे, रा. अवघडराव सांवगी या आरोपीतांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, ५२, ४१, ४२, ६९, ७४ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ३१ आणि महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ चे कलम १, ३ अन्वये वन गुन्हा क्रमांक T – ०३/२०२५ दिनांक १८/०४/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी वनविभाग करत आहे.
सदर कारवाई वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद लाकरा आणि उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) जालना एस. एन. मुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर (प्रादेशिक) के. डी. नागरगोजे यांच्या नेतृत्वात वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन वाय. एम. डोमळे, वनरक्षक भोकरदन डी. व्ही. पवार, जयाजी शिनगारे, घनशाम गव्हाणे, मोमिन तडवी यांनी संयुक्तपणे केली.
या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.