लेहा जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव आणि शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न
By बाळकृष्ण उबाळे

लेहा जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव आणि शिक्षक-पालक मेळावा उत्साहात संपन्न
लेहा प्रतिनिधी: भोकरदन तालुक्यातील लेहा येथे दि. १६ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी ८.०० वाजता मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव आणि शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नय्युम शेख, उपाध्यक्ष अख्तर शहा व सदस्य, मौजे लेहा गावचे सरपंच अशोक फकिरा सोनुने, उपसरपंच संभाजी ताम्हणे व सदस्य, पत्रकार बाळकृष्णा उबाळे, माजी सरपंच संग्रामसिंग राजपूत, पोलीस पाटील दिलीप वखरे, जळगाव सपकाळ केंद्राचे केंद्रप्रमुख बी.यु. सपकाळ, शाळेचे मुख्याध्यापक एस.जी.पवार, सर्व शिक्षकवृंद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या २२ विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. यासोबतच, उपस्थित सर्व पालकांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम आणि त्याचे संभाव्य फायदे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक एस.जी.पवार यांनी केली. सीबीएसईची संकल्पना, त्याचे फायदे आणि जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती ए.जे. श्रीवास्तव यांनी दिली.
मौजे लेहाचे सरपंच अशोक फकिरा सोनुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेला लवकरच पॉवर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. केंद्रप्रमुख सपकाळ यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन जी.बी. भोपळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक बी.टी. तडवी, पी.आर. पडोळ, डी.यु. सास्ते आणि एस.एम. ऊजाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.