विशाल कॉर्नर, जालना येथे आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणी एकाचा खून, आरोपीत ४ तासात पोलिसांच्या ताब्यात
By तेजराव दांडगे

विशाल कॉर्नर, जालना येथे आर्थिक देवाण-घेवाण प्रकरणी एकाचा खून, आरोपीत ४ तासात पोलिसांच्या ताब्यात
जालना, दि. १६: जालना शहरातील विशाल कॉर्नर भागात काल, दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी एका व्यक्तीची हत्या झाली. ३५०० रुपये आणि मोबाईल चोरीच्या कारणावरून गजानन दगडुबा कायंदे (रा. रुमणा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) यांना तीन अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण करून ठार मारले.
चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आणि केवळ चार तासांच्या आत या खुनातील आरोपी भारत पारसनाथ बंकट (रा. भवानी नगर, जुना जालना) याला ताब्यात घेतले. पोलीस आता इतर आरोपीताचा शोध घेत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे चंदनझिरा सम्राटसिंग राजपूत, सपोनि सुशिल चव्हाण, पोउपनि विठठल शिंदे, सचिन सानप, सफौ अप्सर सय्यद, मनसुब वेताळ, पोहेकॉ कृष्णा तंगे, प्रशांत देशमुख, साई पवार, संतोष वनवे, रवी देशमुख, पोना अभिजीत वायकोस, राजेंद्र पवार, पोकों दिपक डेहंगळ, सागर खैरे यांचा सहभाग होता.