जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
By गोकुळ सपकाळ

जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
जळगाव सपकाळ, दि. 16: आज दि.१५ एप्रिल २०२५ रोजी भोकरदन तालुक्यातील जि प केंद्रशाळा जळगांव सपकाळ येथे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी मनोगत व्यक्त केले आणि शाळेला इलेक्ट्रॉनिक बेल व ग्रुप फोटो भेटवस्तू म्हणून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिताताई सपकाळ, सरपंच कुमारी विशाखाताई साळवे, उपसरपंच श्रीम रुख्मणताई सपकाळ, केंद्रप्रमुख बी यू सपकाळ, शाळेची माजी विद्यार्थीनी कु.दिपाली सपकाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळभाऊ सपकाळ हे असून प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य अशोक सपकाळ, प्रशांत बुरकूले, डॉ शालिकराम सपकाळ, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामेश्वर दौड, गणेशराव नाना सपकाळ, राजू साळवे, सोमिनाथ वरपे गणेश राजगुरू, गजानन सपकाळ, अण्णा वाघ आदी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी अकोला जिल्ह्यात पोलिस म्हणून उपस्थितीत असणाऱ्या कु.दिपाली सपकाळ हिस शाळेच्या वतीने तिच्या लग्नाला भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक नासेर शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले असून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा परिषद केंद्रशाळा ही विविध उपक्रम राबविणारी शाळा असून विद्यार्थी घडविणारी प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला माजी विद्यार्थिनी दिपाली सपकाळ यांनी आपल्या भाषेतून दिला. आठवीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतातून शाळेविषयी ऋणव्यक्त केले व शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचे शिक्षक श्री आराक सर श्री पंडित सर श्री साबळे सर श्री बाहेकर सर श्री रुपेश टाकळकर सर श्री भेंडाळे मॅडम व केंद्रप्रमुख बी यू सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळेने दिलेला वैचारिक वारसा जोपासून आपले जीवन संपन्न करावे असा संदेश दिला. यावेळी शाळेचे शिक्षक अनिल सपकाळ, बी टी गायकवाड, श्रीमती सुरेखा मिसाळ मॅडम, श्रीमती मानसी देशमुख मॅडम, श्रीमती भेंडाळे मॅडम, अंशकालीन श्रीमती अश्विनी वाघ, मॅडम शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती. शेवटी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.