बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी
By देवानंद बोर्डे

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी
जालना, दि. ७(प्रतिनिधी)-जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि ‘आत्मा’ च्या
वतीने नुकतेच पाच दिवसीय जिल्हा कृषी प्रदर्शन आजाद मैदान येथे पार पडले.
या शेतकरी महोत्सवामध्ये जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथील बिजांकुर
हायटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने एका दालनामध्ये विषमुक्त
धान्य व भाजीपाला ठेवण्यात आला होता. याला जालन्यातील नागरिकांसह
शेतकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला.या आगळ्या वेगळ्या सेंद्रीय अन्न धान्य
उत्पादन करणार्या बिजांकुर कंपनीने सेंद्रीय गहु, ज्वारी, जवस हे पदार्थ
विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या दालनास जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ
कापसे, आत्माचे संचालक अमोल आगधने, जे.पी.शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी
यांनी भेट देऊन कंपनीच्या उत्पादनांची पाहणी करून कौतूक केले.
या प्रदर्शनात बिजांकुर कंपनीचे संचालक रामकिसन वायाळ, नामदेव नागवे,
संतोष काकडे, विश्वंभर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.