
पारधसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी
पारध, दि. 31: भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली.
पारध येथील जुन्या ईदगाहवर सकाळी 8:30 वाजता आणि नव्या ईदगाहवर सकाळी 9:00 वाजता ईद-उल-फित्रची सामूहिक नमाज अदा करण्यात आली. जुन्या ईदगाहवर मौलाना खलील ईशाअती आणि नव्या ईदगाहवर मुफ्ती अबुसाद मौलाना यांनी नमाज अदा केली. तसेच, एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि देशात शांती नांदो अशी सामूहिक दुआ करण्यात आली.
वक़्फ़ बोर्ड बिलाला विरोध:
वक़्फ़ बोर्ड बिलाच्या विरोधात, उपस्थितांनी हातावर काळ्या (पट्टी) फिती बांधून सामूहिक विरोध दर्शविला.