Jalna: अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांवर पारध पोलिसांची कारवाई
By तेजराव दांडगे

Jalna: अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांवर पारध पोलिसांची कारवाई
पारध, दि. 31: भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावडा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून एकूण 14 हजार रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्राच्या 140 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अवैध दारू विक्री करणारे भगवान सोनाजी टेंभरे (राहणार धावडा), याच्याकडून चार हजार आठशे रुपये किमतीच्या 48 बाटल्या, रमेश भगवान गवळी (राहणार धावडा) याच्याकडून पाच हजार आठशे रुपये किमतीच्या 57 बाटल्या, सचिन रमेश जाधव, वय ४१ वर्षे (राहणार धावडा) याच्याकडून तीन हजार पाचशे रुपये किमतीच्या 35 बाटल्या मिळून आल्या.
या तिघांकडून एकूण 14 हजार रुपये किमतीची देशी दारू भिंगरी संत्राच्या 140 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून या तिघांविरुद्ध अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, psi श्री नेमाने, पोलीस अंमलदार श्री निकम, श्री जाधव, श्री भगत, श्री वाटोरे, श्री खेडकर यांनी केली आहे.
या कारवाईमुळे धावडा परिसरातील अवैध दारू विक्रीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.