
शादीखाना शेडचे भूमिपूजन
पारध, दि. २९ मार्च २०२५: भोकरदन तालुक्यातील पारध गावात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निधीतून मुस्लीम बांधवांच्या शादीखाना शेडचे भूमिपूजन करण्यात आले. माजी सभापती परमेश्वर पाटील लोखंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच गणेश पाटील लोखंडे, मुस्लीम समितीचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजहरखाँ पठाण, शे लतीफ शे रफीक, सलीम खाँ पठाण, शे युनुस शे युसुफ, मुस्लीम समाजाचे नेते नासेरखाँ पठाण, गणेश तेलंग्रे, पंजाब देशमुख, पवन लोखंडे, समी पठाण आणि गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
आमदार संतोष पाटील दानवे यांच्या निधीतून मुस्लीम बांधवांच्या सोयीसाठी हे शादीखाना शेड बांधण्यात येणार आहे. यामुळे पारधमधील मुस्लीम समाजाला विविध कार्यक्रमांसाठी एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे.