गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 5 जणांना अटक, 21 लाख 35 हजरांचा मुद्देमाल जप्त
By तेजराव दांडगे

गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 5 जणांना अटक, 21 लाख 35 हजरांचा मुद्देमाल जप्त
जालना, दि. 31: गोंदी पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या 5 जणांना अटक केली असून 21,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनाक्रम: गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष श्रीनिवास खांडेकर यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की, काही लोक सिध्देश्वर फाटा गोदावरी नदीपात्रात वाळूची चोरटी वाहतूक करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सकाळी 6:00 वाजता नदीपात्रात छापा टाकला, यात 5 जणांना ताब्यात घेतले आणि 21,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल:
1) 10,10,000/- रुपये किमतीचा टाटा कंपनीचा लाल रंगाचा छोटा हायवा (MH-21BH-4917),
2) 10,00,000/- रुपये किमतीचा अशोक लेलैंड कंपनीचा पिवळ्या रंगाचा छोटा हायवा (MH-21, BH-7593),
3) 50,000/- रुपये किमतीची प्लॅटिना कंपनीची मोटार सायकल (एम.एच. 21 बी.एक्स. 1972),
4) 75,000/- रुपये किमतीचे 05 अँड्रॉइड मोबाईल
अटक करण्यात आलेले आरोपीत:
1) राहुल राजू राठोड (वय 23 वर्षे, वाहन चालक)
2) संतोष ज्ञानेश्वर भुमकर (वाहन मालक)
3) विलास कल्याण चौरे (वय 19 वर्षे, लोकेशन देणारा)
4) मनोज तुळसीराम वैदय(वाहनचालक)
5) मनोज अशोक राऊत (लोकेशन देणारा)
6) किशोर आसाराम राठोड(फरार)
पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे: या घटनेसंदर्भात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांची कामगिरी: ही कारवाई अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, जालना, आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालना, विशाल खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सपोनी आशिष श्रीनिवास खांडेकर, गोंदी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, पोउपनि बलभिम राऊत, पोउपनि किरण हावळे, पोहेका / अशोक नागरगोजे, पोका / वैजिनाथ काळे, पोका सचिन साळवे यांनी सहभाग घेतला.