बदनापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर 3.839 किलो गांजा जप्त; एका आरोपीला अटक, 1.51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बदनापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर 3.839 किलो गांजा जप्त; एका आरोपीताला अटक, 1.51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बदनापूर-छत्रपती संभाजीनगर रोडवर 3.839 किलो गांजा जप्त; एका आरोपीला अटक, 1.51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बदनापूर: जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचनेनंतर, स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बदनापूर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 3 किलो 839 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीताला अटक करण्यात आली असून, गांजा आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली स्कूटर असा एकूण 1,51,780/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27/05/2025 रोजी बदनापूर गावच्या हद्दीतून बदनापूर ते छत्रपती संभाजीनगर रोडने एक इसम त्याच्या स्कूटरवरून अंमली पदार्थ गांजाची अवैध वाहतूक करणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला.
या संयुक्त कारवाईत, अजय संजय चावरे (वय 26 वर्ष, रा. कसबा गांधीचमन जुना जालना) या आरोपीताला त्याच्या ताब्यात असलेल्या स्कूटरच्या डिक्कीमध्ये मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजासह पकडण्यात आले. एकूण 3 किलो 839 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची स्कूटर असा एकूण 1,51,730/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक अजय जैस्वाल, पोलीस ठाणे बदनापूर, यांच्या तक्रारीवरून नमूद आरोपीताविरुद्ध पोलीस ठाणे बदनापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सपोनि राठोड, पोउपनि. जैस्वाल, पोउपनि चौरे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कैलास खाडे, दिपक घुगे, संभाजी तनपुरे, किशोर पुंगळे, रमेश काळे, सचिन राऊत, सोपान क्षीरसागर तसेच पोलीस ठाणे बदनापूरचे पोलीस अंमलदार सायंबर, वाघमारे, मोरे, कराड, हुसे, गोलवाल, शेख, तडवी, जाधव यांनी पार पाडली.