ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पासाठी 2028 टार्गेट! एक तासाचं अंतर काही मिनीटांत पूर्ण होणार
2028 target for Thane-Borivali Twin Tunnel project! One hour distance will be completed in a few minutes

ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पासाठी 2028 टार्गेट! एक तासाचं अंतर काही मिनीटांत पूर्ण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे ‘ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पा’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश :
✅ राज्यातील कोणताही पायाभूत प्रकल्प यापुढे रखडणार नाही याची दक्षता घ्या आणि प्रत्येक प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करा.
✅ ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.
✅ दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करा.
✅ बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करा.
✅ प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्री काम करण्याची परवानगी घेण्यात यावी.
✅ बोरीवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून १ महिन्यात कार्यवाही पूर्ण करा.
✅ यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करा.
✅ संबंधित अधिकाऱ्याने 1 महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे.
✅ बोरीवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करा.
✅ भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन द्यावे.
ठाणे-बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पाविषयी थोडक्यात…
ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा 11.84 किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प 2 पॅकेज मध्ये उभारण्यात येणार आहे. बोरीवली बाजूने 5.75 किलोमीटर पॅकेज 1 आणि ठाणे बाजूने 6.09 किलोमीटर पॅकेज 2 असणार आहे. पॅकेज 1 मध्ये ₹6,178 कोटी आणि पॅकेज 2 मध्ये ₹5,879 कोटी अशाप्रकारे एकूण ₹12,057 कोटींचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कार्बन उत्सर्जन प्रतिवर्ष 1.4 लाख मेट्रिक टनाने कमी होणार. सध्याच्या रस्त्याने ठाणे ते बोरीवली जायला एक ते सव्वा तास लागतो. बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी 15 मिनिटांवर येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर इंधनही वाचणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.