सावखेडा तापी नदी पात्रातील विद्रुपीकरण हटवले; विक्की जाधव मित्र परिवाराच स्तुत्य उपक्रम.
संस्कृतीचे जतन व रक्षण करत गणेश मूर्त्यांची विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या.

अमळनेर – येथील नुकतेच आपल्या अमळनेर शहर व तालुक्यातील श्रीगणेश विसर्जन उत्साहात पार पडत असतांना आणि पर्यावरण स्वछता,सामाजिक बांधिलकी व आपल्या संस्कृतीचे जतन व रक्षण करणे या निस्पृह भावनेतून काल २२ रोजी सकाळी ७ वाजेपासुन ते कार्य संपेपर्यंत सावखेडा पुला जवळील तापी नदीपात्राची सार्वजनिक स्वछता करण्यात आली.
गणपतींचे तापी पात्रातील विसर्जनाने अनेक मूर्त्यांचे विटंबना,वाताहत,मोडतोड पाहता अमलनेरच्या विकीआबा जाधव मित्रपरिवाराच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात नदी पात्रातील गणरायाची रीतसर विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या आहेत.पाचव्या दिवसापासून गणपतीचे विसर्जन करण्यात येत असून अमळनेर व चोपडा तालुक्यातील गणपती मूर्त्यांचे विसर्जन सावखेडा येथील तापी नदी पात्रात केले गेले मात्र अनेक भक्तांनी वरूनच मुर्त्या फेकल्याने अनेकांची मोड तोड झाली तसेच नदी पात्रात पाणी नसल्याने काहींनी नदी पात्रात लहान मोठ्या अशा हजारो मुर्त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या एरवी गणेश मंडळात भक्ती भावाने पूजा , आरती करणारे भक्त विसर्जन वेळी गणेशाची अशी अवस्था करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते धार्मिक भावना दुखावून अप्रत्यक्ष मूर्त्यांची विटंबना होत होती गणपतीचे तोंड,सोंड,दात,हात,पाय असे अवयव तापी पात्रात पडलेले होते मात्र एकही मंडळ रीतसर विसर्जन वा विल्हेवाट साठी पुढे आले नाही.
अखेर अमळनेर चे विकी जाधव यांनी त्यांच्या विक्की जाधव मित्रपरिवाराच्या ३० कार्यकर्त्यांची टीम सोबत घेऊन स्वखर्चाने ४ ट्रॅक्टर,२ ढंपर,१ जे.सी.बी. मशीन घेऊन भर पावसात तापी पात्रात उतरले लहान मोठ्या नदी पात्रातील सर्व मुर्त्या गोळा करून त्यांचे रीतसर विसर्जन केले , मोठ्या मूर्त्यांसाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी नदी पात्रात खड्डे खोदले व त्या पाण्यात मोठ्या गणपतींचे विसर्जन केले विकी जाधव मित्र परिवाराच्या सामाजिक कार्यामुळे पोकळ भक्ती दाखवणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे त्यांचे हे कौतुकास्पद कार्य पाहून प्रांताधिकारी संजय गायकवाड,पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या सह अनेक सामाजिक संघटना, संस्था, विविध स्तरावरून अभिनंदन केले आहे.
यावेळी विक्कीआबा जाधव मित्र परिवाराचे कार्यकर्ते सोनू महाले, विशाल जाधव,रवी घोगले, डॅनी जेधे,कुणाल सोनवणे,श्याम मराठे,पारस धाप,रवींद्र पाटील, विशाल संगीले,विनय पोतले,राज माळी,सनी परदेशी, शुभम बडगुजर,सागर भुरट,सनी जाधव,प्रकाश डाबोड, शक्ती डाबोड यश घोगले, कुणाल घोगले,शंकर घोगले,अजय धाप,सागर भुरट, सनी जाधव, शुभम देशमुख, निलेश मराठे, यश घोगले,कुणाल घोगले,भटू पाटील, शंकर घोगले,अजय धाप, गोलू पाटील, राहुल आर्मी, यांनी आज रोजी सकाळी ७ वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत भर पावसात नदी पात्रात ट्रॅक्टर,जे सी बी, ढंपर फसत असताना परिश्रम घेऊन गणरायाचा आदर राखत मद्यधुंद भक्तांच्या वात्रटपणा,विक्षिप्त पणा वर पांघरून घालून सामाजिक बांधिलकी जपली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी ज्या गणेश भक्तांना तापी नदी पात्रात गणेश विसर्जन करायचे असेल त्यांनी फरशी पुलाजवळील मारुती मंदिराच्या मागे मोठी वाहने विक्कीआबा जाधव मित्र परिवारातर्फे उपलब्ध केलेली आहेत असे आवाहन जाधव मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.
विक्कीआबा जाधव (सामाजिक कार्यकर्ते)