मंगरूळ विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय पाटील यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन सन्मानित…
अमळनेर– जळगाव जिल्हा रोटरी क्लब तर्फे अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक संजय कृष्णा पाटील यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी नीलकंठ गायकवाड होते.
जिल्हयात शालेय अध्यापनव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रयोग राबविणाऱ्या १० शिक्षकांचा जळगाव जिल्हा रोटरी क्लब तर्फे गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब च्या अध्यक्षा संगीता पाटील, सचिव राजेश परदेशी,माजी अध्यक्ष विनोद बियाणी,रमण जाजू, शँतनू अग्रवाल हजर होते.यावेळी माजी शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या मनोगतात म्हणाले की माणूस हा सन्मानाचा भुकेला असून त्याच्या केलेल्या कार्याचा योग्यवेळी सन्मान केला तर त्याला प्रेरणा मिळते आणि त्याच प्रेरणेतून नावीन्य निर्माण करून शिक्षक राष्ट्राची उभारणी करत असतात. प्रास्ताविक रोटरी क्लब च्या अध्यक्ष संगीता पाटील यांनी केले यावेळी शुभदा नेवे , प्रवीण पाटील , संजय बडगुजर, संगीता पवार, नयिमोद्दीन शेख, ज्ञानेश्वर पाटील, फिरदोस शेख आदींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला सत्कारार्थी संजय पाटील , संगीता पवार यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन राजेन्द्र बडगुजर , सरिता खाचणे यांनी केले आणि आभार राजेश परदेशी यांनी मानले.