महत्वाचेमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील मासिक व साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

Maharashtra State Lottery monthly and weekly draw results for March announced

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या मार्च महिन्यातील मासिक व साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

            मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे मार्च २०२५ मध्ये २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गुढीपाडवा (भव्यतम)७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी होळी विशेष१९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव२१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २५मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आले असल्याचे वाशी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा)यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या महावीर लॉटरी सेंटरकोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. 50 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक 11 / 1590 या श्रीगणेश एंटरप्रायजेसमुंबई यांचेकडून -विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत. 

मार्च- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १९३४८ तिकीटांना रू. १,६३,१३,५००/- व साप्ताहिक सोडतीतून ५५७०२ तिकीटांना रू. १,९९,७२,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या  कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??