शिक्षण
संपत्तीच्या पुनर्निर्मितीसाठी आर्थिक साक्षरते आवशकता : प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आर्थिक आणि डिजिटल साक्षरता शिबिर संपन्न..
पुणे (हडपसर) : भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत पाच नंबरची आहे. असे अजूनही आपल्याकडे आर्थिक साक्षरता आहे का? साक्षरता असणे आणि ज्ञान असणे ही बाब वेगळी आहे.
व्यक्तिगत पातळीवर आर्थिक विकास साधायचा असेल तर आर्थिक साक्षरता गरजेचे आहे. देशाचा अर्थ संकल्प असतो तसा आपल्या घराचा आर्थिक संकल्प असावा. उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन खर्चाचे, गुंतवणूकीचे नियोजन करता येण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. संपत्तीच्या पुनर्निर्मितीसाठी आर्थिक साक्षरते आवशकता आहे. आज बँकिंग क्षेत्रात ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बँकिंग सेवा सहज उपलब्ध होऊ शकतात. त्याच्या वापर करताना खबरदारी घ्यावी लागते पण त्यामुळे वेळेची बचत होत असते. असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक प्रवीण शिंदे, संचालक सुरेश घुले उपस्थित होते. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिंगबर दुर्गाडे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.
या प्रसंगी डॉ. शंतनू जगदाळे, व्यवस्थापक दिलीप जाधव, नरेश सिरसम, सुनील भोंडवे , विभागीय अधिकारी हेमंत भगत, विकास अधिकारी राहुल भंडलकर, शिवाजी खलसे, मोहन हरपळे , मोहिनी जगदाळे, प्रभाताई सुरवसे, स्नेहल कांबळे, कृष्णकांत कोबल, प्रा. अनिल जगताप आदी उपस्थित होते. सुजित शेख यांनी यांनी मार्गदशन केले. संचालक प्रवीण शिंदे, संचालक सुरेश घुले यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यकमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक ससाणे यांनी केले तर आभार डॉ नीता कांबळे यांनी मानले.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.