पारध येथे ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ उपक्रम!
'एक दिवस गावकऱ्यांसोबत' ग्रामपंचायत कार्यालयातर्फे '(ग्राम दरबार)' या विशेष उपक्रमाचे आयोजन

पारध येथे ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ उपक्रम!
पारध, दि. 21: भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे येत्या बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत (ग्राम दरबार)’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ठीक ९:०० वाजता पाराशर महाराज मंदिरात हा कार्यक्रम पार पडणार आहे.
ग्रामस्थांच्या समस्या व अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तात्काळ तोडगा काढता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार हा कार्यक्रम होत असून, यात विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी, पारध बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांनी या महत्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या समस्या व सूचना मांडण्यासाठी हा एक उत्तम मंच आहे, तरी याचा लाभ घ्यावा, असे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने कळवले आहे.