नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत बातमी समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आता संपली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तानमधील तीन स्टेडियममध्ये होणार असून रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे हे सामने होतील.
स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील एकूण ८ संघांना २ गटात विभागण्यात आलं आहे. आयसीसीकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे कायम असले तरी भारताचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार होतील. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला, तर उपांत्य आणि अंतिम सामने देखील तटस्थ ठिकाणी होतील. जर भारजीय संघ या स्पर्धेतून बाद झाला, तर हे सामने पाकिस्तानच्या लाहोर आणि रावळपिंडीमध्ये होतील. तसेच सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
चॅम्पियन ट्रॉफीचे दोन गट
अ गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश
ब गट – अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे? जाणून घ्या?
हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे तीनही साखळी सामने तटस्थ ठिकाणी होतील २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये खेळवण्यात येतील, तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबो किंवा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला जाण्याची शक्यता आहे. हे सामने दुबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक खालील प्रमाणे..
१९-०२-२०२५ : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२०-०२-२५ : भारत विरुद्ध बांगलादेश, तटस्थ
२१-०२-२५ : अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२-०२-२०२५: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३-०२-२५ : भारत विरुद्ध पाकिस्तान, तटस्थ
२४-०२-२५ : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५-०२-२५ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
२६-०२-२०२५ : अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२८-०२-२५ : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश , रावळपिंडी
२८-०२-२५ : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
१-०३-२५ : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
२-०३-२५ : भारत विरुद्ध न्यूझीलंड, तटस्थ
४-०३-२५ : पहिली उपांत्य फेरी तटस्थ
५-०३-२६ : दुसरी उपांत्य फेरी लाहोर
९-०३-२५ : फायनल तटस्थ/लाहोर
१०-०३-२५ : राखीव दिवस
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??