शिक्षण
हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धेमध्ये रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांचे घवघवीत यश ; हवेली
पुणे (हवेली) : रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांचे घवघवीत यश संपादीत केले.
नवचैतन्य मित्र मंडळ संचलित रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयातील इ. ९ वी ते १२ वी गटातून विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांनी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२४-२५ गोल्डन सिएरा पब्लिक स्कूल कवडीपाट येथे दि. २४ व २५ डिसें. २०२४ रोजी सहभाग घेतला होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटन भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्य. जि.प. पुणे) व संजय नाईकडे (शिक्षणाधिकारी प्राथ. जि.प. पुणे) यांच्या हस्ते खोसे (गट शिक्षांधिकारी पं.स.हवेली ), सुरेश कांचन (उपाध्यक्ष पुणे जि. मुख्या.संघ) आशा कटके ( केंद्रप्रमुख शेवाळेवाडी) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये तालुक्यातून एकूण १०५ प्रकल्प मांडण्यात आले होते.
यामध्ये १) इ. ९ वी ते १२ वी च्या दिव्यांग गटातून चि. वेदांत झांबरे (इ. १० वी ) याने प्रथम क्रमांक पटकविला.तसेच २) निबंध स्पर्धा गटातून कु. सृष्टी लांडे हिने तृतीय क्रमांक मिळविला व ३) शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक शिक्षक गटातून शहादेव उदमले यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांना प्रकल्प निर्मितीसाठी शहादेव उदमले, कैलास जाधव, सौ.गायकवाड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे नवचैतन्य मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक सुरवसे व सर्व संचालक मंडळ, रमणलाल शहा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता बडेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक, सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” https://d9news.in/
फेसबुक https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम https://www.instagram.com
डेली हंट https://profile.dailyhunt.in/sunil24
वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.