पुणे : साठेखत केवळ एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो. असे हस्तांतरण होण्यासाठी साठेखतामध्ये ज्या अटी आणि शर्ती नमूद केलेल्या असतात, त्यांची पूर्तता होणे आवश्यक असते.
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५४ नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार आहे. विशेष म्हणजे, असा करार झाला म्हणजे खरेदीदाराला कसलाही हक्क, बोजा वा हितसंबंध निर्माण होत नाही.
साठेखतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क ‘खरेदीदाराला ‘ प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला’ संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो.
दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे ‘खरेदीखत होऊन खरेदीदाराला त्या मिळकतीचा संपूर्णपणे ताबा मिळतो.
साठेखत कशासाठी / का केले जाते?
१) बऱ्याचवेळा जमिनीचे अथवा मिळकतीचे हस्तांतरण लगेचच करणे शक्य नसते. अशावेळी या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठेखत केले जाते.
२) जमीन भोगवटादार-२ ची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती विकता येत नाही.
३) त्याचप्रमाणे भाडेपट्टा, गहाण, दान किंवा कुठल्याही प्रकारचे जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही.
४) त्याचप्रमाणे जमिनीवर सरकारचे आरक्षण असेल किंवा जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप आणि चतुःसीमा माहीत नसेल अथवा जमिनीवर इतरांचा ताबा किंवा अतिक्रमण असेल, अशा अडचणी असल्यास जमिनीचे लगेचच खरेदीखत करून हस्तांतरण होणे शक्य नसते.
५) बऱ्याचदा काही व्यवहार मोठे असतात, अशावेळी खरेदीदाराकडे पूर्ण व्यवहाराचे पैसे नसतात. टोकन म्हणून काही पैसे दिले जातात व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्याचे ठरलेले असते. अशा व्यवहारात घेणारा व देणारा या दोघांनाही ‘कायदेशीर संरक्षण देण्यासाठी साठेखत केले जाते.
६) बऱ्याचदा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेत असतो. कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्त्तीच्या नावे मालमत्तेची कागदपत्रे किवा करार करणे गरजेचे असते. अशावेळी साठेखत केले जाते. जेव्हा खरेदीदाराला कर्ज मिळते तेव्हा उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत केले जाते.
साठेखत रद्द करता येते का?
१) साठेखताला पूर्ण मुद्रांक व नोंदणी शुल्क लागते. नंतर असे मुद्रांक व नोंदणी शुल्क खरेदीखतास लागत नाही. पुढे जमिनीचे हस्तांतरण खरेदीखताद्वारे केले जाते.
२) खरेदीखतानंतरच पुढे ‘रेकॉर्ड ऑफ द राइट्स’ ला नाव लागते व मालमत्तेचे टायटल पूर्ण होते.
३ ) साठेखत कधीही रद्द होऊ शकते. खरेदीखत मात्र सहजासहजी रद्द होत नाही.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??