अखेर अमळनेर तालुक्यातील पिकविम्या पासून वंचित शेतकऱ्यांना मिळाला पिकविम्याचा लाभ-अनिल भाईदास पाटील
5 कोटी 97 लाख रक्कम मंजूर,जिल्हा बँकेने सतत प्रयत्न करून विमा कंपनी कडून पैसा आणला.
अमळनेर (प्रतिनिधी) पिकविम्याचे पैसे भरूनही लाभापासून वंचित राहिलेल्या अमळनेर तालुक्यातील ११८९ शेतकरी सभासदांना ५ कोटी ९७ लाख रु रक्कम मंजूर झाली असून आपल्यासह जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ,अधिकारी वर्ग आणि शेतकऱ्यांनी यशस्वीपणे पाठपुरावा केल्याने हि हक्काची रक्कम विमा कंपनीकडून खेचून आणण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अनिल भाईदास पाटील यांनी दिली.व उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच न्याय मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
या कामी जेष्ठ नेते आ एकनाथराव खडसे,जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचे मार्गदर्शन तसेच सौ तिलोत्तमा पाटील यांच्यासह सर्व संचालक,जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व शेतकरी बांधवांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.पीक विम्याचा पैसा भरूनही अमळनेर तालुक्यातील असंख्य पात्र शेतकरी सभासद लाभापासून वंचित राहिले होते,त्यांची नावे यादीत नसल्याचे समजल्यानंतर मोठा रोष शेतकरी बांधवात निर्माण झाला होता,यामुळे अनेक आंदोलने शेतकऱ्यांनी केली,जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हा विषय असल्याने बँक प्रशासनाकडे जोमाने बाजू मांडत संबधित विमा कंपनीवर जिल्हा बँकेस गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले,तसेच यानंतर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु ठेवला,खरे पाहता संबंधीत सर्व शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरली होती केवळ तांत्रिक कारण व विमा कंपनीची चूक यामुळेच हे शेतकरी वंचित राहिल्याचे अनिल पाटील यांच्यासह संचालक मंडळाने पटवून दिल्याने विमा कंपनीने माघार घेत वंचित १२०० शेतकाऱ्यांपैकी ११८९ शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ९७ लाख मंजूर केले आहेत,लवकरच हे पैसे संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत.
दरम्यान उर्वरित वंचित शेतकऱ्यांसाठी देखील पाठपुरावा सुरु असून संचालक मंडळाच्या प्रयत्नाने १०० टक्के न्याय मिळेल असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.तर याकामी विशेष प्रयत्न करणारे आ खडसे,बँक अध्यक्ष रोहिणी खडसे,बँक संचालक अनिल भाईदास पाटील,सौ तिलोत्तमा पाटील व सर्व संचालक मंडळ,जिल्हाधिकारी निंबाळकर तसेच बँक अधिकाऱ्यांचे जाहीर आभार शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान- प्रा सुभाष पाटील
अनिल पाटील यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने व अभ्यासू अधिकार्यांनी हा विषय समजुन घेवून जोमाने लावून धरला तसेच जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनीही लक्ष देवुन संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास बँकेला आदेश दिला त्याचेच फलित म्हणुन आज ११८९ सभासदांना न्याय मिळाला आहे,आजच्या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत याकामी मदत करणारे जिल्हाधिकारी श्री. किशोरराजे निंबाळकर, बँकेचे अधिकारी व संचालक मंडळाचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया शिरुड येथील प्रा सुभाष सुकलाल पाटील यांनी व्यक्त केली
उर्वरित शेतकऱ्यांना देखील न्याय मिळवून द्यावा – सचिन पाटील
अनिल पाटीलांसह जिल्हा बँक संचालक मंडळाने वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन ते खरे शेतकरी पुत्र असल्याचे सिद्ध केले असून उर्वरित शेतकरी बांधवाना देखील न्याय मिळवूंन देण्यात ते यशस्वी ठरतील अशी अपेक्षा असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस चे अमळनेर तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँक शेतकऱ्यांचीच असंल्याचे झाले सिद्ध-प्रविण पाटील
खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा विडा काहींनी उचलला आहे परंतु सुज्ञ शेतकऱ्यांनी या बँकेवर अनिल दादा सारखे खरे शेतकरी पुत्र प्रतिनिधी म्हणून पाठविल्याने आज शेकडो शेतकर्यना न्याय मिळाला असून हि बँक शेतकाऱ्यांचीच असल्याचे सिद्ध झाले आहे,यामुळे सर्व संचालक मंडळाचे आम्ही अभारीं असल्याचे पंचायत समितीचे सदस्य प्रविण पाटील यांनी म्हटले आहे.