Breaking
अलफैज उर्दू गर्ल्स माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती उत्साहात संपन्न..
अमळनेर येथील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन तालीम दिवस साजरा करण्यात आला २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त शासनाच्या आदेशानुसार अमळनेर येथील अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये नवीन तालीम दिवस साजरा करण्यात आला. यात क्षेत्रभेट, स्वचछता अभियान, वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, समाजातील व्यापारी व कारागीर यांचे अनुभव कथन घेण्यात आले. शेवटी गांधी जयंतीचे औचित्य साधून तंबाखू व गुटखा मुक्त अभियान अंतर्गत प्रभातफेरी काढून शाळेत मुख्याध्यापिका खान अनीसा यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.रफीक शेख व आरीफ शेख यांनी गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागा बद्दल माहिती दिली व शेवटी आरीफ बागवान यांनी आभार प्रदर्शन केले.