सुनिल थोरात (प्रतिनिधी)
मुंबई : राज्यात शेती क्षेत्रामध्ये डिजिटल डेटा सर्व्हिस सेवेच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या संकल्पनेवर agristack योजना राबविण्यात येणार आहे.
या नवीन योजने मुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान मिळवणे सोपे जाणार आहे.तसेच शेतकऱ्यांना पिकावर कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्डसाठी कर्ज उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधारकार्ड प्रणालीचा वापर केला जातो.
त्यावरून शेतकऱ्याची ओळख पटवली जाते. तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी योजनेच्या माध्यमातून मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी आपल्या गटामध्ये जाणे अनिवार्य केले आहे. पिकाची ई पीक पाहणी करण्यासाठी पिकाचे फोटो घेऊन ते अपलोड करावे लागणार आहे.बीड जिल्ह्यामध्ये २०२३ आणि २०२४ साठी agristack अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. याद्वारे बीड मधील ६ शेतकऱ्यांना १५ ते ४५ मिनिटात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही योजना राबवली जाणार आहे.किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांना त्यांची शेतीची कामे सहज सुरू ठेवता येतील. या योजनेतील कर्जाची रक्कम बियाणे, खते, सिंचन आणि इतर कृषी गरजांसाठी वापरली जाऊ शकते. ही योजना शेतकऱ्यांना प्रगत कृषी उपकरणे वापरण्याची सुविधा देखील प्रदान करते, जेणेकरून ते त्यांच्या पीक उत्पादन कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करू शकतील.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??