Breaking
शिक्षण विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी २६ रोजी शिक्षक दरबाराचे आयोजन…
अमळनेर-शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी २६ रोजी दुपारी ३ वाजता जळगाव येथे माध्यमिक पतपेढी सभागृहात शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे तसेच अनेक शाळांचे व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्रलंबित असून त्या समस्या सोडविण्यासाठी जळगांव प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यासह विविध अधिका ऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी शिक्षक दरबारात हजर रहावे असे आवाहन पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील यांनी केले आहे.