सुनिल थोरात (हवेली)
सांगली : महाराष्ट्रातील घटना किंवा स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचे असो, त्यावर गोपिचंद पडळकरांचा प्रतिवाद हा ठरलेला दिसुन आलेला जनतेने पाहिलाय. सातत्याने महाराष्ट्रच्या राजकारणात गेल्या पाच-दहा वर्षांपासून गोपिचंद पडळकर हे एक वादग्रस्त पण चर्चेतलं मोठ नाव..
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील टीका असो की शिवसेना (उबाठा), काँग्रेस वर केलेली टिका ना त्या कारणाने गोपिचंद पडळकर प्रसारमाध्यमांमध्ये नेहमीच स्टेटमेंट द्यायला तयार असतात.
वंचित बहुजन आघाडीतून भाजपात आलेल्या हा नेता त्यांना मंत्रिपद मिळणार अशी मागील काळात चर्चा रगंली होती. परंतु, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांचा पत्ता कट झाल्याचे पाहायला मिळाले.
पडळकर धनगर समाजाचे नेते
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पार्टीशी वाद झल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीते गेले होते. मात्र तेथे जास्त रमले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेला संधी दिली.
बारावीपर्यंतच झाले शिक्षण
सांगलीमधील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचं गाव. त्यांचे शिक्षण फक्त १२ वीपर्यंतच झालं आहे. सुरुवातीला समाजकार्य व त्यानंतर ते राजकारणात आले. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद, तीन वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, पाच वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आता त्यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.
पडळकर आणि वाद ; मंत्री पदाचा घात..
पडळकरांचं वक्तव्य आणि वाद हे समिकरणच झालं आहे. शरद पवारांवर ते विखारी टिका करतात. गेल्या आठवड्यातच त्यांनी १०० शकुनी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं म्हटलं होतं. त्यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद झाले आणि याच कारणामुळे मंत्रिमंडळात स्थान न भेटल्याचे बोलले जात आहे.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??