सामाजिक

वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत;

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

मुंबई : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील तब्बल २ लाख ११३ वीज ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे.

या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे. तर राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीज ग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, यात सर्वाधिक ४० टक्के ग्राहक पुणे विभागातील आहेत.

महावितरणच्या राज्यातील १६ परिमंडळांपैकी सर्वाधिक पुणे परिमंडळामध्ये १ लाख ३४ हजार ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. ‘गो-ग्रीन’ योजनेतून कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाइल अॅप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरण्याच्या पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे.

इमेलच्या पर्यायास १० रूपये सवलत

● महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.
● पणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील वीज ग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद चांगला आहे.
● गो-ग्रीन मधील ग्राहकांना ‘ई-मेल’ व एसएमएस द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन ऑनलाइनद्वारे त्वरित वीजबिल भरणा करणे शक्य झाले आहे.
● लघुदाब वीज ग्राहकांनी कागदी बिलांचा वापर बंद करून ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणेचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभागांतर्गत ‘गो-ग्रीन’
योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे तर सातारा जिल्ह्यातील १३ हजार १५३ ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.

                         जतनास योग्य

■ ‘गो-ग्रीन मधील ग्राहकांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. त्याची गरजेनुसार केव्हाही प्रिंट काढता येईल.
■ सोबतच वेबसाइटवर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.

‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणचे मोबाइल अॅप किंवा वेबसाईट येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??