प्रत्येक नोटरी विधीज्ञाच्या मागे संघटना ठामपणे उभर आहे – अँड सय्यद सिकंदर अली
By तेजराव दांडगे
प्रत्येक नोटरी विधीज्ञाच्या मागे संघटना ठामपणे उभर आहे – अँड सय्यद सिकंदर अली
जालना जिल्हा वकील संघ तथा महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेच्यावतीने भारत सरकार नवनियुक्त नोटरी, ज्येष्ठ नोटरी विधीज्ञ तथा विधीज्ञासाठी कायदेशीर शिबीराचे आयोजन दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी नोटरी विधीज्ञांना ज्येष्ठ विधीज्ञ श्री नितेशजी ललवाणी यांनी नोटरी दस्त नोंदणी बाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. प्रत्येक नोटरी दस्ताला 25 रुपयाचे नोटरी मुद्रांक टिकीट लावणे व त्याची रजिस्टरमध्ये रितसर खतवणी करणे नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्येक दस्त करतांना सर्व पक्षकार यांची शहनिशाकरुन त्यांची स्वाक्षरी रजिस्टरवर घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि गोवा नोटरी संघटनेचे अध्यक्ष अँड सय्यद सिकंदर अली यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, दस्त दक्षतेने करा तथा नोटरी वकीलांसाठी नियमीत कार्यशाळा व सुविधा मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशिल असून प्रत्येक नोटरी विधीज्ञामागे संघटना ठामपणे उभी असल्याचे ग्वाही सुद्धा दिली.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड. विकास पिसुरे, बारकाऊन्सील चे समन्वयक अँड. लक्ष्मण उढाण, उपाध्यक्ष अँड. कामरानखान, सचिव अँड. नंदकिशोर पुंगळे, सहसचिव अँड. शरद कुलकर्णी, जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. बाबासाहेब इंगळे, मुख्य लोकअभिरक्षक अँड. महेश वाघुंडे, अँड. महेश धन्नावत, अँड. आनंद झा, प्रसिद्धी प्रमुख अँड. अरविंद मुरमे, ई. व अनेक विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.