आपला जिल्हासामाजिक
विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी विकासासाठी विरोध मोडीत काढणार ; चित्तरंजन गायकवाड
शिवरस्ता नागरिकांसाठी वरदान ठरणार? विकासासाठी ग्रामसभेचे आयोजन, जनतेने विरोध मोडीत काढावा ; चित्तरंजन गायकवाड..
पुणे (कदमवकवस्ती) : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नित्य नियमाने अपघात होत आहेत. या अपघातामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कदमवकवस्ती, लोणी काळभोर दोन्ही गावामध्ये नागरिकांचे जाणे येणे मोठ्या प्रमाणात असते. या दोन्ही गावांच्या रहदारी पुणे सोलापूर महामार्गावर दैनंदिन होत असते. पुणे सोलापूर महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी शिवरस्ता होणे फायद्याचे आहे.
या अनुषंगाने हा रस्ता भविष्यात तिन्ही गावातील नागरिकांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. असे मत नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, हा शिवरस्ता लोणी काळभोर गावातील महादेव मंदिर, घोरपडे वस्ती, बोपदेव मंदिर, पांडवदंड, गायकवाड वस्ती व कवडीपाट टोल नाक्यापर्यंत बनविण्याचे भविष्यातील नियोजन सुरु आहे. यासाठी २५ कोटी रुपयांचा निधीची गरज लागणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी मागणी केली असून निधी मंजूर झाल्यानंतर लवकरच कामास गती मिळणार असून लवकरात लवकर कामास सुरवात होईल.
पुणे सोलापूर महामार्गावरील टोलनाका, काळभोर लाॅन्स चौक, पेट्रोल पंप, एच पी गेट, लोणी स्टेशन, एमआयटी कॉर्नर व लोणी गावात जाणारा लोणी कॉर्नर या चौकांमध्ये नित्यनेमाने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या मुख्य रस्ता वरुन भाजी मंडई, हाॅस्पिटल, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघाताचे सत्र चालू असते.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व फुरसुंगी हा शिवरस्ता झाला तर अधिक अधिक नागरिकांना याचा फायदा होईल. या शिवरस्त्याचा वापर होईल. व अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. असे चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले आहे.
एक सामाजिक जबाबदारीने जनतेच्या विकासासाठी व हितासाठी शिवरस्ता खुला होणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. कदमवकवस्ती, लोणी काळभोर व फुरसुंगीतील नागरिकांसह विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा. यासाठी शिवरस्ता तयार होणे गरजेचे आहे. या रस्त्यासाठी कोणीही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी राजकारण करू नये. जर कोण चांगले काम करीत असेल तर राजकारण न करता सपोट/ मदत करून एक आदर्श घालावा. विरोधाला विरोध दर्शविण्यासाठी विरोध करू नये. गावातील विरोधक जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनता ही सुज्ञ व जागृत आहे. व ती योग्य निर्णयाला पाठींबा नक्की देईल. त्यामुळे विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी याचा त्यांना काडीमात्र ही फायदा होणार नाही. तसेच गावाच्या विकासासाठी सर्व जनतेने ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहून शिवरस्ता होण्यासाठी विरोधकांचा विरोध मोडीत काढावा असे आवाहन नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी केले आहे.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.