रमाई महिला बचतगटाचे वतीने रमाई जयंती साजरी
जालना, धावडा: आज ७/०२/२५ रोजी त्यागमुर्ती आणि विश्वातील सर्व लेकराची आई असणारी सर्व भारती यांना माया देणारी रमाई भीमराव आंबेडकर यांची१२७ व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत जालना जिल्हा व तालुका भोकरदन तालुक्यातील धावडा येथे रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला… या कार्यक्रमाला रमाबाई बचत गट व विशाखा बचत गट व सर्व उपासक तथा उपासीका महिला किलबिल मंडळ शाळकरी विद्यार्थी यांनी भाग नोंदवला. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन मुलींना व मुलांना त्याग मूर्ती रमाई च्या जीवनाचे काही क्षण आणि त्यांच्या जीवनातील खास आठवणी, व त्यांनी बाबासाहेबाना शिक्षा पूर्ण करून समाज कार्य करण्याकरिता केलेला त्यागाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना माहीती देण्यासाठी व या कार्यक्रमाचे नियोजनासाठी कॅप्टन गौतम साबळे यांनी आतोनात परिश्रम घेतले. रमाई जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरं देत चर्चा करण्यात आली. प्रश्णांचे उत्तरं देणाऱ्यांना उपासक व उपशिका राहुल भाऊ सरला इंगळे यांच्याकडून गौरव पुरस्कार , “बुध्द धर्माचा प्रचार व प्रसार” करणारी पुस्तके वाटण्यात आले..आणि त्या बरोबरच विद्यार्थ्याना त्यांच्या उत्साह वाढावा म्हणून प्रथमश्रेनीचे व्यावसायिक उपासक संतोष शंकरराव इंगळे रोख रक्कम देवून गौरंवित केले.या कार्यक्रमाचे सर्व श्रेय बचत गटांना आहे असे उपासक साबळे यांनी आपल्या अभार मानताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालक कॅप्टन गौतम साबळे आयोजक रमाई बचत गट व विशाखा बचत गत आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणारे वाड्यातील सर्व अबालवृद्ध आणि धावडा गावातील मंडळी…असे माध्यमाशी बोलताना संचालकांनी सांगितले.