क्राईम न्युज
अंबिका ज्वेलर्सच्या कामगाराने सोन्यावर मारला डल्ला; ४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन कामगार फरार..
पुणे हवेली : कदमवाकवस्ती लोणी स्टेशन येथील एबीके अंबिका ज्वेलर्स या नावाने असलेल्या सोन्याच्या दुकानात दागिन्यांची चोरी झाली असल्याने खळबळ झाली.
ही चोरी दुकानात काम करणाऱ्या कामगारानेच केली असल्याचे बाब समोर आली. दुकानातील सुमारे ४ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून दुकानातील कामगार फरार झाला आहे.
फरार झालेल्या कामगाराचे नाव अमोल विठ्ठल गवळी (वय-२३, सध्या रा. पांडवदंड, फुरसुंगी, ता. हवेली) असून याप्रकरणी अंबिका ज्वेलर्सचे मालक बाबासाहेब वामन गायकवाड (वय-4४७, वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब गायकवाड हे कदमवाकवस्ती येथील रहिवासी असून एक व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात एबीके अंबिका ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. या सोन्याच्या दुकानात कामगार सोने चांदी विक्री करतात. त्यातील एका कामगाराने सोनसाखळी चोरण्याचा कारनामा केला.
फिर्यादी च्या नुसार दुकानातील कामगार अमोल गवळी याने दुकानातील ६ सोन्याच्या चैन चोरी करून पळून गेला आहे. सोन्याच्या चैनीचे वजन व कंसात रक्कम पुढील प्रमाणे आहे. ८ ग्रम ७.७० मिली (६६ हजार ६५२ रुपये), १४ ग्रॅम ८०० मिली (१ लाख १२ हजार ४८० रुपये), ५ ग्रॅम ११० मिली (३९ हजार ४४४ रुपये), ५ ग्रॅम ९३० मिली (४५ हजार ६८ रुपये), ८ ग्रॅम ५०० मिली (६४ हजार ६०० रुपये) व १४ ग्रॅम २३० मिली (१ लाख ८ हजार १४८) असा एकूण ४ लाख ३६ हजार ३९२ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाले आहे.
याप्रकरणी अमोल गवळी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी करीत आहेत.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.