महिला बचत गटातर्फे शुद्ध गावराणी तुपातील मोदक विक्री शुभारंभ..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर गणेश पर्वात येणाऱ्या नागरिकांना स्वस्त दर्जेदार आणि रुचकर प्रसाद मिळावा तसेच स्त्रियांना रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक विकासाची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी अमळनेर महिला मंचाने मोदक विक्रीचा शुभारंभ करून बचत गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.
येथील डॉ राहुल मुठे यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता या शुध्द गावराणी तुपाच्या मोदक विक्रीचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील अमळनेर महिला मंच अध्यक्षा डॉ अपर्णा मुठे, अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा वसुंधरा लांडगे, प्रा रंजना देशमुख, दीपा पाटील, विजया जैन, पद्मजा पाटील, प्रा जयश्री साळुंखे आदी उपस्थित होते.
पहिल्याच शुभारंभात एक हजार शुद्ध गावराणी तुपाच्या मोदकांची विक्री झाली असून पाव किलो या प्रकारात ४० जणांनी ऑर्डर नोंदविली.
अलीकडच्या काळात तर आपण आरोग्याच्या बाबतीत जास्तच जागरूक झालो आहोत. फार चमचमीत पदार्थ खात असतो . त्यातल्या कॅलरीज आपल्याला खुणावत राहातात. शिवाय बाहेरून प्रसाद आणला तर ही सगळी पथ्ये पाळून कोण तयार करणार? तिथे स्वच्छता कशी असणार, हा प्रश्नही मनात असतोच.. अशातच
जर तुम्हाला स्त्रियांनी, स्वच्छ परिसरात केलेले आणि आपल्या दैनंदिन आहाराचं वैशिष्टय़ जपलेलं दिले तर नागरिकांना नक्कीच आनंद होईल. महिनाभरात अशाच स्वरूपात दररोज नाश्ता सेंटर चा पण शुभारंभ करण्यात येणार आहे
जेवल्यासारखं वाटत नाही असं म्हणणारे खूप जण आहेत, कारण आपल्याला सवय आहे ती तव्यावरची गरमागरम भाकरी, झुणका आणि मिरच्याचा ठेचा खाण्याची. वरणभात-भाजी, भाकरी किंवा चपाती, कोशिंबीर असा साधा मेनू आपल्याला आवडून जातो. तेव्हा असा कॅलरी साधणारा नाश्ता पण सुरू करण्यात येणार आहे
ज्या यासाठी मंडळांना मोदक हवे असतील त्यांना ४०० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध करून दिले जातील
तयास संपर्क डॉ अपर्णा मुठे गणेश हॉस्पिटल 9422211274, तिलोत्तमा पाटील वेदप्रिय रेसिडेन्सी 9423367111, दीपा पाटील गायत्री नगर 9588630568, भारती गाला रसमंजू कॉम्प्लेक्स 9423903199 आदींशी संपर्क साधावा.