आजचाच तो दिवस दोन महान व्यक्तींचा जन्म झाला; जाणून घेऊयात थोडक्यात
राजमाता जिजाऊ यांची जयंती, स्वामी विवेकानंद यांची जयंती
आजचाच तो दिवस दोन महान व्यक्तींचा जन्म झाला; जाणून घेऊयात थोडक्यात
राजमाता जिजाऊ यांची जयंती : हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला.
छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात आणि कर्तृत्वात राजमाता जिजाऊंचा सिंहाचा वाटा आहे. मात्र त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आज देखील महाराष्ट्राच्या गड कपारीत पाहायला मिळतात. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे मोठी गर्दी करत असतात.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. तर जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली आणि याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला.
स्वामी विवेकानंद यांची जयंती : भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.
रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली आहे. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. तसेच 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांना दिले जाते.