बॅक नियम : बऱ्याचदा सामान्यांकडून बँकांमध्ये ठराविक रक्कम Saving स्वरुपात ठेवण्याला प्राधान्य दिलं जातं.
बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सुविधेमध्ये रोकड जमा करण्याचीसुद्धा सुविधा दिली जाते. पण, इथंही काही नियमांची अंमलबजावणी मात्र महत्त्वाची बँकांनी ठरवली आहे.
बँकात रोकड जमा करण्यासाठी Income Tax विभागानं काही नियम लागू केले आहेत. या नियमानुसार एखादी व्यक्ती एका दिवसात खात्यात १ लाख रुपये जमा करू शकते. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार वर्षभरात एखाद्या खातेधारकानं १० लाखांहून अधिक रक्कम जमा केली तर, आर्थिक वर्षातील या उलाढालीमध्ये आयकर विभागाला हस्तक्षेप करावा लागतो.
बॅकेत पैसे जमा करण्यासाठीच्या नियमांमधील महत्वाचे काही मुद्दे…
एका आर्थिक वर्षात व्यक्ती जास्तीत जास्त १० लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करू शकते. ही मर्यादा वेतनधारक करदात्यांना लागू आहे. करंट अकाऊंटसाठी रोकड जमा करण्याची मर्यादा ५० लाख रुपये इतकी आहे. करंट अकाऊंटमधील ही मर्यादा मोठे वितरक, उत्पादक आणि विविध सुविधा देणाऱ्यांसाठी साधारण १ ते २ कोटी रुपये इतकी असते. बँक खात्यात जर तुम्ही ५० हजारांहून अधिक रक्कम जमा करत असाल तर, तुम्ही तिथं PAN क्रमांक देणं अपेक्षित आहे. एखाद्या व्यक्तीच्या खात्यात वर्षभरात १० लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली, तर बँक याची माहिती आयकर विभागाला देते.बँक खात्यात नियमित स्वरुपात रक्कम गोळा न केल्यास खात्यात रक्कम जमा करण्याची रक्कम २.५० लाख रुपये केली जाते.
अनुच्छेद 194A विसरून चालणार नाही
एका आर्थिक वर्षात खातेधारकानं १ कोटींहून अधिक रक्कम काढल्यास त्यावर २ टक्के टीडीएस रक्कम लागू असते. मागील ३ वर्षांमध्ये आयटीआर न भरलेल्यांना २ टक्के टीडीएस भरावा लागतो.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??