अमळनेरला मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे नित्यमंगल पालखी शोभायात्रा
दर मंगळवारी मंगळ ग्रह मंदिरात निघेल पालखी…अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे येथे श्री मंगळ जन्मोत्सवाचे औचित्य साधून नित्यमंगल पालखी शोभायात्रा काढण्यात आली . हजारो भाविकांची त्यात उपस्थिती होती. नित्यानंद फाउंडेशनचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शेकडो साधकही सहभागी झाले होते, हे विशेष …!
आता यापुढे दर मंगळवारी सायंकाळी श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विधिवत रित्या ही पालखी निघेल. देशातील खूपच कमी देवस्थानात नियमित पणे पालखी निघते . त्यात आता श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा समावेश झाला आहे.
पहाटे पाचला श्री मंगळदेव ग्रह मंदिरात वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेक झाला. पहाटे सहा वाजता श्री मंगळ देवाचा प्रतिकात्मक स्वरूपात जन्मोत्सव झाला . प्रथेप्रमाणे दर वर्षी मंदिरातील जुने ध्वज काढून नवे ध्वज लावले जातात . या विधीचे मानकरी योगेश पांडव यांनी सपत्निक सकाळी वाजत – गाजत ध्वज आणले . त्यानंतर देवाला ५६ भोगाचा नैवद्य दाखविण्यात आला. विशेष महाआरतीही झाली .सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईच्या निष्णात कारागिरांनी बनविलेली व फुलांनी सजवलेली पालखी वाडीत नेण्यात आली. तेथून हजारो विद्यार्थी , वारकरी, भाविक , सेवेकरी यांच्यासह नित्यमंगल पालखी शोभायात्रा मार्गस्थ झाली . त्यात माऊली बँड पथक,जी.एस. हायस्कुल चे लेझीम पथक,डी.आर.कन्याशाळा, साने गुरुजी विद्यालय , साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय ,येन.टी. मुंदडा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा ,एम.एस. मुंदडा माध्यमिक शाळा,लोकमान्य विद्यालय, पी.बी.ये.इंग्लिश मेडिअम स्कुल, तासखेडे येथील भजनी मंडळ , धरणगाव व वाडीभोकर येथील वारकरी , वाडीतील वेद पाठशाळेतील विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता.
शोभायात्रा सराफ बाजार,दगडी दरवाजा, स्व.पन्नालालजी जैन चौक,कोंबडी बाजार ,निकुंभ हाईट्स,सुभाष चौक,पाच कंदील, मोठा बाजार ,फरशी रोड ,चोपडा नाका मार्गे श्री मंगळदेव ग्रह मंदिरात गेल्यावर सांगता झाली .शोभायात्रेत सहभागी झालेल्यांसाठी राजेंद्र वर्मा (आशिष अलंकार ) , विशाल शर्मा ( आशु नोव्हेलती ) यांनी पाणी , चॉकलेट व बिस्किटे लक्ष्मणदास पंजाबी ( दुर्गा मेडिकल ) व मनीष जोशी (इंद्रभुवन हॉटेल )यांनी पाणी , अर्बन बँकेचे संचालक भरत ललवाणी ( पायल हॉटेल ) यांनी नाश्ता तर लायन्स क्लब व अनमोल ग्रुप तर्फे सरबत वाटप करण्यात आले .
संपूर्ण रस्त्यावर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जागोजागी पालखीचे पूजनही करण्यात आले. दर्शनासाठीही शोभायात्रेच्या मार्गावर दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी केली होती.
यानिमित्ताने मंदिरात भव्य भोमयाग करण्यात आला .सायंकाळच्या भजन संध्येत स्वरांजली म्युझिकल ग्रुपने बहारदार भजने सादर केली. दरम्यान जन्मोत्सव व पालखीउत्सवाच्या निमित्ताने मंदिरात विविध फुलांनी नयनरम्य सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. केशव पुराणिक , आदित्य गुरुजी ( गणेशपुरी) व त्यांचे सहकारी तसेच तुषार दीक्षित,प्रसाद भंडारी , देवेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले.
शोभायात्रेत नित्यानंद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रमिला माई व पदाधिकारी , मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाद्यक्ष एस. येन.पाटील, सचिव एस. बी.बाविस्कर , सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी , विश्वस्थ अनिल अहिरराव आदींसह अनेक मान्यवर होते .
पावसाचा असाही योगायोग….
मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या आजवर अनेक शोभायात्रा निघाल्या आहेत . जवळपास प्रत्येक शोभायात्रा समयी हमखास पाऊस पडतो.मात्र त्यामुळे शोभायात्रेवर विपरीत परिणाम होत नाही तर उत्तम वातावरण निर्मिती होते. याही वेळेस असेच झाले .