Jalna: ‘एक दिवस गावासोबत’: पारध बुद्रुकमध्ये ‘ग्राम दरबार’ उत्साहात संपन्न!
10 विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या उपक्रमात दिली विविध योजनेची माहिती

Jalna: ‘एक दिवस गावासोबत’: पारध बुद्रुकमध्ये ‘ग्राम दरबार’ उत्साहात संपन्न!
पारध, दि. 23: छत्रपती संभाजी नगर विभागाचे आयुक्तांच्या ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या संकल्पनेतून भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे ‘ग्राम दरबार’ मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि शासकीय योजना व त्यांच्या समस्यांवर थेट संवाद साधला.
माजी सभापती मनीष श्रीवास्तव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, सरपंच सौ. शारदाबाई बाबुराव काकफळे आणि उपसरपंच शेखर श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महत्वपूर्ण कार्यक्रमात पशुधन विकास अधिकारी श्री मुंडे, सी.एस.ओ. डॉक्टर रेषमा चौधरी, विस्तार अधिकारी गजानन पाखरे, आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख, सार्वजनिक बांधकाम शाखेचे अभियंता श्री शेजुळ, जे.जे.एम शाखेचे अभियंता श्री जाधव, विस्तार अधिकारी शिक्षण बडगे सर, तालुका व्यवस्थापन अंजली जाधव, आर. जी. एस. ए. भोकरदनचे गणेश सोळुंके, केंद्रप्रमुख मनोज लोखंडे, कृषी सहाय्यक शैलेश तळेकर, चव्हाण तलाठी श्री तळेकर, ग्राम विकास अधिकारी संजय पुरी, जाधव सिस्टर, वालसावंगी पि.एच.सी. सुपरव्हायझर श्री इंगळे, जि.प. शाळेचे मुख्यध्यापक श्री सोनुने, स्व. राजेंद्र जी महाविद्यालयाचे प्रा. श्री गालफाडे, जनता विद्यालयाचे प्रा. संग्राम देशमुख, ग्रामपंचायत सदस्य जगन लोखंडे, परमेश्वर अल्हाट, अक्षय तेलंग्रे, वर्षाताई जाधव, दिनेश सुरडकर, गणेश सुभाष लोखंडे, सुखदेव भुते, अक्षय लोखंडे, बाबुराव काकफळे, जगदिश लोखंडे, पवन लोखंडे, शेख सर, शालेय समिती अध्यक्ष विनोद लोखंडे, अमोल जहागिरदार, पत्रकार गजानन देशमुख, समाधान तेलंग्रे, रामसिंग ठाकुर, तेजराव दांडगे, सागर देशमुख, विकास लोखंडे यांच्यासह बचत गट एस.आर.पी. च्या संगिता लोखंडे व संजीवनी कोलते, गावातील सर्व आशा स्वयंमसेविका, सर्व अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी, शिक्षक आणि अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, आरोग्य विभागाच्या डॉ. रेषमा चौधरी, कृषी विभागाचे शैलेश तळेकर, पंचायत समिती विभागाचे गजानन पाखरे, पशुसंवर्धन विभागाचे श्री मुंडे आणि शिक्षण विभागाचे श्री बडगे या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजना आणि कार्यांविषयी गावकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी आपल्या समस्या व अपेक्षा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, ज्यावर सकारात्मक चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ग्राम रोजगार सहाय्यक संतोष पाखरे यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपानंतर बाबुराव काकफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी पारध ग्रामपंचायतीने शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार आणि इतर मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला, त्यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील केली होती
विभागीय आयुक्तांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावकरी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला आणि शासकीय योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचली. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि प्रशासनानेही त्यांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन दाखविल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.