पेट्रोल डिझेल च्या दरवाढी निषेधार्थ अमळनेरात रास्ता रोको…
अमळनेर– पेट्रोल डिझेल च्या दरवाढ निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोर्चा काढून बसस्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेल मधील सातत्त्याची वाढ, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली,शासनाने खोटा हमी भाव जाहीर केला, स्वामिनाथन आयोग लागू केला नाही अशा विविध निर्णयच्या व धोरणाच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीने आंदोलन केले भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या जि.प.विश्रामगृह जवळून मोर्चा काढण्यात आला बसस्थानकाजवळ काही वेळ रस्ता रोको करून मोर्चा पुढे पाचपावली चौक,बालेमिया मशीद,बाजार पेठ अशा विविध ठिकाणी दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले दुकानदार स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करून मोर्चा गेल्यानंतर मात्र दुकाने सुरू करत होते बंद ला अल्प प्रतिसाद मिळाला.मोर्चात प्रदेश काँग्रेसच्या ऍड ललिता पाटील, महिला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ,तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, युवक चे सुनील शिंपी,भागवत पाटील,अर्बन बँकेचे माजी चेअरमन शांताराम ठाकूर, मुन्ना शर्मा, कृ.उ.बा.चे संचालक सुरेश पिरन पाटील, धनगर दला पाटील, सुभाष पाटील, संभाजी पाटील, बी.के.सूर्यवंशी ,अरुण शिंदे, प्रताप पाटील, कैलास पाटील, ऍड रज्जाक शेख, शांताराम शामराव पाटील, प.स.सदस्य विनोद जाधव,किसान सभेचे नरेंद्र पाटील हजर होते.