पाझरा नदीवरील मुडी वालखेडा के.टी.वेअरची आमदार चौधरींनी केली पाहणी..
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित,लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अमळनेर-(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी येथे पाझरा नदीवर मुडी वालखेडा दरम्यान कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून तो अत्यंत गळक्या स्थितीत आहे.त्याची पाहणी आ शिरीष चौधरी यांनी करून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.यामुळे पांझरा काठावरील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाझरा नदीवर असलेल्या या बंधाऱ्यांस 75 गाळे असून सर्व गाळ्याच्या पाट्या ह्या जीर्ण तसेच नादुरुस्त झाल्या आहेत.तसेच केटी वेअरच्या खालून पाणी गळती होत असून काही प्रमाणात स्ल्याब तुटला आहे. त्यामळे पाझरा नदीचे पाणी पूर्णत वाया जात होते ,यामुळे त्या पाण्याचा शेतकऱ्यांना तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीना फायदा होत नव्हता. या ठिकाणी वालखेडा, लोण ,भरवस ,तसेच इतर गांवाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी आहेत.बंधारा दुरुस्त झाल्यास या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे,याबाबत येथील ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ व गावाच्या लोकप्रतिनिधीनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन बंधाऱ्यांची पाहणी करावी व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आमदारांनी लागलीच अधिकाऱ्यांना सपर्क साधत पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना केल्या तसेच नविन पाट्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रसेन पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना या धरणाकडे आज पर्यंत एकही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नसल्याचे आम्ही लक्षात आणून दिले यामुळे आमदार चौधरी यांनी तात्काळ बंधाऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या समस्या एकुन घेतल्या तसेच गेल्या काही दिवसापूर्वी तालुक्यात कांदा चाळ अनुदानाचे लक्ष्यांक वाढून मिळावे यासाठी चंद्रसेन पाटील यांनी लेखी निवेदन आ चौधरी याना दिले होते,सदर शेतकरी उपयोगी व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न व अडचण लक्षात घेता आमदारांनी कृषी मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला व तालुक्यातील एकूण 162 ऑनलाइन केलेल्या प्रकरणाना लवकरात लवकर लाभ मिळण्याची विनंती त्यांनी केली असे सांगून आमदारांच्या तत्परतेबद्दल विशेष कौतुक केले.यावेळी न प गटनेते प्रवीण पाठक, कृ.उ.बा संचालक उदय पाटील, अनिल महाजन, मुडी सरपंच काशिनाथ माळी, बोदर्डे सरपंच संतोष चौधरी, योगराज सदांनशिव,मा.पंचायत समिती सभापती चंद्रसेन पाटील, उपसरपंच नारायण पाटील, प्रवीण महाजन, गजू महाराज, शरद पाटील, हेमंत सोनवणे, संजय सोनवणे, नाना पाटील, डॉ चव्हाण, गोकुळ सोनवणे, भारत पाटील, नाना चौधरी, अविनाश पाटील, रामचंद्र पाटील, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, गुलाब पाटील, राजेद्र वानखेडे , सुभाष पाटील, दादाराम पाटील,केतन पाटील, नंदू देडगे, नाना पाटील, जंगलू पवार, लोटन पाटील, भरत पाटील,प्रमोद भोई, शेखर देशमुख, प्रफुल्ल चौधरी, प्रफुल्ल वानखेडे, तुषार सैदाने, तसेच मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.