क्राईम न्युज
पत्नीने डाव साधला, सतीश वाघ यांना निर्घृणपणे का संपवलं? संपूर्ण घटनाक्रम..
पुणे (हडपसर) : सतीश वाघ हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण झाल्यानंतर अवघ्या ३७ किमी अंतरावर वाघ यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणी सतीश वाघची बायको मोहिनी वाघ यांनीच सुपारी देऊन आपला पती सतीश वाघ यांची हत्या केल्याचं पोलीसांच्या तपासात समोर आलं आहे.
पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या हत्येमुळे पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. परंतु पुणे पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आणि सतीश वाघ यांच्या हत्येची बायकोच खरी सुत्रधार निघाली आहे. मोहिनी वाघ हिने अनैतिक संबंधातून ५ लाखांची सुपारी देऊन सतीश वाघ यांना संपवलं. यासाठी शेजारी राहणारा मुख्य आरोपी जावळकर याला वाघ यांचं अपहरण आणि हत्येची जबाबदारी सोपवली होती.
कसं झालं अपहरण?
९ डिसेंबरच्या पहाटे शेवाळवाडीत सतीश वाघ हे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवलं आणि अपहरण करून घेऊन गेले. अपहरणानंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. साधारण साडे आठ वाजता हा तपास सुरू झाला होता, अशी माहिती मिळाली. गुन्हे शाखेला सकाळी ९ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश देण्यात आले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या १२ टीमने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू १२ वाजता झाला. त्यानंतर तीन वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाले.
वाघ यांना ७२ वेळा भोसकलं आणि प्रायव्हेट पार्ट कापला
शोध सुरू असताना सहा वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. हडपसर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास आयकार आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली. घटनास्थळी रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळला होता. सतीश वाघ यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ७२ वेळा त्यांना चाकूने भोसकलं होतं. एवढंच नाहीतर मारेकऱ्यांनी वाघ यांचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला होता. अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात आतापर्यंत कुणा-कुणाला अटक?
सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांना २५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. पवनकुमार शर्मा, विकास शिंदे आणि अक्षय जावळकर या तिघांना पुणे पोलिसांनी आधीच अटक केली होती. तर धाराशिवमधून २४ डिसेंबरला अतिश जाधवला अटक केली होती. त्यानंतर प्रकरणाला वळण मिळालं. अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांचा शेजारीच आहे. मोहिनी वाघ यांनीच अक्षय जावळकरला ५ लाखांची सुपारी दिली होती.
सतीश वाघ यांच्या हत्येचा घटनाक्रम
९ डिसेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता सतीश वाघ यांचं अपहरण
प्रत्यक्षदर्शीने ७ च्या सुमारास कुटुंबियांना दिली घटनेची माहिती नातेवाईक, स्थानिक यांना सगळ्यांना माहिती कळविण्यात आली.
७.३० वाजता घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळवली
८.३० वाजता हडपसर पोलिसांनी तात्काळ प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
गुन्हे शाखेला ९ वाजता टीम रवाना करण्याचे आदेश
९.३० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या १२ टीम ने प्रत्यक्षात शोधाशोध सुरू केली.
१२ वाजता सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनच्या मदतीने तपास सुरू
३ वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात दाखल
शोध सुरू असताना संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उरूळी कांचनच्या घाटात बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती
– हडपसर पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस मृतदेह सापडलेल्या ठिकाणी पोहोचले.
रात्री ८ वाजेच्या सुमारास फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, मृतदेह घेतला ताब्यात
११ डिसेंबर – पोलिसांनी ८ ते १० संशयित आरोपींना घेतलं ताब्यात
२४ डिसेंबर – धाराशिवमधून संशयित आरोपी असलेल्या शेजाऱ्याला अटक
२५ डिसेंबर – सतीश वाघ यांची बायको मोहिनी वाघ यांनीच सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” – https://d9news.in/
फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
डेली हंट – https://profile.dailyhunt.in/sunil24
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
वाॅटसअप – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj
वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.