‘टोपी’ खालून सूत्रे हलविणारा बापजी’ बच्चा बच्चा कहता है, बापजी का हुकूम है..!
आरोपीभक्तांना आश्रय देणारा ‘गुरू’, मोकाट की मोक्कात..?
अमळनेर पोलिसांचे पहिले पाऊल अभिनंदनीय….
अमळनेर – (प्रतिनिधी) येथील बाबा बोहरी खून प्रकरणातील संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार कैलास नवघरे, तौकिफ शेख, मुस्तफा शेख, तन्वीर शेख यांचेवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींना काल नाशिक मोक्का न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सदर आरोपींना अमळनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास अमळनेर पोलिस उपधिक्षक रफिकशेख हे करीत आहेत.
या घटनेमुळे गुन्हेगारी जगतात दहशत तर सामाजिक क्षेत्रातून पोलिसांचे स्वागत करण्यात येत आहे. गुन्हेगारीचा कायम स्वरूपी बिमोड व्हावा अशी अपेक्षा सामान्य नागरिक करीत असतानाच केवळ हेच गुन्हेगार आहेत की गुन्हेगारांना आश्रय देणारा पडद्या मागील ‘ब्रेन’ सुटून गेला आहे या कडे पोलीस तपास यंत्रणेने लक्ष देणे आता गरजेचे आहे. शहरातील भर वस्तीत मध्यवर्ती ठिकाणी एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याचा खून होतो, आणि अनेक घरफोड्या व चोरी सह गुंडागर्दीत सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होईल ही या पोरसावदया मुलांची करामत असेल हे बुद्धी ला पटणारे नाही. या बेकार मुलांचे माथे भडकावून कुणीतरी “ब्रेन” वापरला आहे, या मागे कुणी तरी ‘टोपी’ खालुन सूत्रे हलवीली असण्याची शक्यता जास्त वाटते. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे “टोपी” खालील सूत्र ‘बापजी’ बनून मुलांना खेळवत होता का?, याचाही तपास झाला पाहिजे.
या गुन्ह्यात नरसिम्हा या हिंदी सिनेमात “बापजी”नावाचा खलनायक त्याच्या मुलासह आसपासच्या तरुणांना बेकायदा धंदे करायला लावत, खोऱ्याने पैसे कमावतो, लूट करून सोन, चांदी,हातात गळ्यात घालून मिरवतो, वेळ आली तर त्यांनाच बकरा बनवून लटकवतो. याच हिंदी सिनेमाची पुनरावृत्ती अमळनेर शहरात घडली आहे. आज ही शहरातील बापजी स्वतः पुढारपण करत मोकाट सांड सारखा फिरत असावा, अशा लोकांना खरे तर “मोक्का” च्या जागी ताब्यात घेऊन ढुंगणावर फटके देण्याची गरज आहे. त्याला मोकाट फिरू देण्याऐवजी खाकी वर्दीने, तरुणांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या खऱ्या “बापजी” चा शोध घेणे गरजेचे आहे. तरच शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण येईल. गेल्या चार महिन्यांपूर्वी खून प्रकरणात अटक करण्यात आलेला नरसिम्हां रुपी आरोपी कैलासने या बापजीचा खून करणार होतो, अशी कबुली च विश्वसनीय सुत्रांकडे दिली होती.
दुर्दैवाने “बाबा”चाच खून झाला. आणि कैलास तुरुंगात गेला. आणि या सिनेमाची ‘स्टोरी’ अपूर्ण राहिली. वेळीच आरोपी कैलास ला पोलिसांनी बेड्या घातल्या नसत्या तर या बापजी चा खून झाला असता आणि नरसिम्हा सिनेमाची स्टोरी शहरात पूर्ण झाली असती. आणि त्यामुळे शहरात आणखी खून झाल्याने दहशत वाढली असती. मात्र अमळनेर पोलिसांनी कम्बर कसत आरोपीला ताब्यात घेतले. आणि पुढील संकट टळले. पोलिसांमुळे या कथित बापजी चा पुनर्जन्म झाला आहे, त्याने पोलिसांचे पाय धुवून प्यायला हवेत. तरीही पोलिसांचे उपकार फिटणार नाहीत.
अमळनेर शहरातील संघटित गुन्हेगारीत असाच कुणी बापजी आहे का? टोपी घालून खुनाच्या धारा काढण्याचे षडयंत्र सुरू आहे का? या दृष्टीने तपास झाला तर गुन्ह्याची पाळेमुळे उलगडून काढणे सोपे होईल.
तपास यंत्रणा हुशार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणे हा हेतू नाहीच. या बाबा खून प्रकरण बाबत सर्वत्र प्रश्न उपस्थित होत आहेत. लोक चर्चा करताहेत, बच्चा-बच्चा कहता है की बापजी का हुकुम है.!
हा बापजी कोण ? कुणाच्या टोपी खाली काय दडलंय? या गुन्ह्यातले अन्य गुन्हेगार सापडण्याची पोलीसांनी वर्तवलेली आणखी दाट शक्यता याचा अर्थ काय? या प्रकरणात एकूण गुन्हेगार किती आहेत ?, त्यापैकी मोकाट किती आहेत? त्यामुळे शहरात आणखी अपराध वाढतील का? , चोऱ्या, खुन’ दरोडे पडतील की काय ? अशी आशंका लोक माणसांमध्ये आहे. म्हणूनच तपास यंत्रणेने या सर्व प्रश्नांची जनतेला उत्तरे देण्याच्या दिशेने पावले उचलावीत व अमळनेरकर जनतेला निर्भयपणे जगता यावे यासाठी, कोणत्याही गुन्हेगाराला संरक्षण मिळणार नाही, माफी मिळणार नाही, कोणीही पुढारी आडवा आला तरी , पैशांच्या व सत्तेचा दबावापुढे झुकणार नाही. खऱ्या अर्थाने न्याय होईल व शहर गुन्हेगारीमुक्त होईल याची ग्वाही पोलिसांनी दिली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांचे पाहिले पाऊल पडले आहे, म्हणून त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. अशी मनोगतही लोक चर्चेतून पुढे येत आहेत.
तूर्तास एवढेच…..