खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप; हॉटेल संजय मधील घटना..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील बस स्थानक परिसरातील हॉटेल संजय वरच्या टेरेस वर झालेल्या खून प्रकरणी एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांनी सुनावली सोबत आरोपीस दोन हजार रुपयांचा दंड देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ८ मे २०१६ रोजी काम आरोपी वेटर चेतनसिंग नहारसिंग पावरा रा मूळ पटेल फाल्या सावरखेडा ता सेंधवा जि बडवानी मध्यप्रदेश ह मु चांदणी कुर्हे हा हॉटेलमध्ये सर्व्हिस करत होता यावेळी त्याच्याच्या सोबत आलेला भाऊ मयत राजू मयासिंग पावरा याला रा मुळ पटेल फाल्या सावरखेडा ता सेंधवा जि बडवानी मध्यप्रदेश हा आलेला आहे त्याला भेटून मी लगेच परत येतो असे सांगितले व दोन्ही संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास परतले व वरच्या मजल्यावर याला आराम करायला घेऊन जाऊ का असे मॅनेजर नंदू नारायण चौधरी यांना विचारले याठिकाणी कामगार आराम करीत असतात त्यामुळे त्याला परवानगी दिली व चेतन हा नेहमी आपल्याप्रमाणे सर्व्हिस चे काम करीत राहिला व यावेळी त्याने त्याला गावी पाठवायचे आहे यासाठी ५०० रुपये मागितले व चेतन यावेळी चेतन हा खाली वर ये जा करीत होता यावेळी चेतन पुन्हा वर गेला व थोडया वेळाने खाली आला यावेळी आचारी भिकन ताराचंद पाटील यांनी भाजी कांदे कापण्याची सूरी कुठे आहे असे चेतनला विचारले यावेळी चेतन हा त्यापूर्वी सूरी वर घेऊन गेलेला होता व ती आणून देतो असे सांगितले परंतु तो सारखा ये जा करीत असल्याने संशय आल्याने मॅनेजर नंदू चौधरी व दुसरा मॅनेजर अमरजीत बाळू पाटील यास राजुला खाली बोलावून आण असे सांगितले यावेळी सायंकाळी सात सुमारास राजू हा रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता व त्याच्या गळ्यावर मारल्याने गंभीर दुखापत झाली असून सूरी पण त्याठिकाणी पडली आहे व हालचाल बंद पडलेली होती यावेळी विचारणा केली असता चेतनने माझ्यावर राजुने वीट मारून फेकली होती यामुळे मला संताप येऊन सदर प्रकार केल्याचे सांगितले त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून सदर इसमास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली पुढे राजू याचा मृत्यू झाला व याप्रकरणी अमळनेर पोलिसात खुनाची नोंद झाली या प्रकरणात तपासाधिकारी उदयकुमार साळुंके यांनी तपास केला यात ९ साक्षीदार तपासण्यात आले.सरकारी वकील म्हणून राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले मिळालेल्या परिस्थिती जन्य पुराव्यावरून न्यायाधीश राजीव पी.पांडे यांनी आरोपी चेतन यास जन्मठेपेची शिक्षा व २ हजार रु दंड अशी शिक्षा सुनावली आहे व दंड न भरल्यास ६ महिने पुन्हा शिक्षा असा निकाल दिला आहे.