उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या बंगल्यात चोरांचा दोन लाखाचा डल्ला…
अमळनेर (प्रतिनिधी)- बाजार समितीचे उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना क्रांतीनगर भागात ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान घडली.
अमळनेर बाजार समितीचे सभापती अनिल पाटील हे शस्त्रक्रिया झाली असल्याने पुणे येथे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दाखल असल्याने त्यांचे धुळे रोडवरील क्रांतीनगर मधील घर बंद होते अज्ञात चोरट्याने गैरफायदा घेत ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान घरचा कडी कोंडा तोडून घरातील दोन्ही मजल्यावरील खोल्यां मधील कपाट उघडून तसेच दरवाजे तोडून ५० ग्राम वजनाच्या ७५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या,१८ग्राम वजना च्या ३७ हजार रुपयांचा नेकलेस २ हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या,४७ हजार रुपये रोख व इतर वस्तू असा सुमारे एक लाख एक्कात्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला ७ रोजी सकाळी ७ वाजता अनिल पाटील यांच्या सून श्रुती पाटील पुणे येथून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यांनी पोलिसांना कळवले असता पोलीस निरीक्ष अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक किशोर पाटील, विजय साळुंखे, प्रमोद बागडे, रवी पाटील, योगेश महाजन ,योगेश पाटील यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच श्वान पथक व ठसे तज्ञ बोलावण्यात आले होते श्वान पथकातील शेष राव राठोड व निलेश झोपे यांनी चॅम्प नावाच्या श्वानला विविध वस्तूंचा गंध दिल्यानंतर पश्चिमेला काही अंतरापर्यंत चॅम्प श्वानाने रस्ता दाखवला तर ठसे तज्ञ स पो नि सचिन गांगुर्डे व साहेबराव चौधरी यांनी वस्तूंवरील ठस्यांची नोंद घेतली श्रुती पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास स.पो.नि.प्रकाश सदगीर करीत आहेत.