जालना पोलिसांची मोठी कारवाई: ‘अल्पवयीन’ मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीताला ‘ए.एम.टी.यू.’ ने ठोकल्या बेड्या!
( By तेजराव दांडगे ) तांत्रिक विश्लेषणाद्वारे घनसावंगी प्रकरणाचा छडा; मुलीला सुखरूप ताब्यात!

जालना पोलिसांची मोठी कारवाई: ‘अल्पवयीन’ मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीताला ‘ए.एम.टी.यू.’ ने ठोकल्या बेड्या!
तांत्रिक विश्लेषणाद्वारे घनसावंगी प्रकरणाचा छडा; मुलीला सुखरूप ताब्यात!
जालना/घनसावंगी (दि. १६ नोव्हेंबर २०२५): जालना जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (A.M.T.U. – Anti-Human Trafficking Unit) सन २०२४ मध्ये दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्याची यशस्वीपणे उकल केली आहे. घनसावंगी येथून एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपिताचा आणि पीडितेचा शोध घेऊन, कक्षाने मोठी कामगिरी बजावली आहे.
📍 काय होते प्रकरण?
गुन्हा: पोस्टे घनसावंगी येथे दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNSS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास हस्तांतरण: बराच कालावधी उलटूनही पीडित मुलगी व आरोपीत मिळून न आल्याने, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास अ.मा.वा.प्र. कक्ष, जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.
🔍 ए.एम.टी.यू. ची शोधमोहीम
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीत व पीडितेची माहिती मिळवण्यास सुरुवात केली.
मिळालेली माहिती: आरोपीत नामे प्रल्हाद बंडू ऊर्फ शंकर लोखंडे (रा. नवीन बसस्थानकाचे पाठीमागे, घनसावंगी) हा पीडित अल्पवयीन मुलीसह पैठण फाटा, ता. अंबड, जि. जालना येथील एका विटभट्टीवर काम करत असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाई: खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने त्वरित कारवाई करत, पैठण फाटा येथून आरोपीत प्रल्हाद लोखंडे याला ताब्यात घेतले. पीडित अल्पवयीन मुलीसही सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास: ताब्यात घेतलेल्या आरोपिताला आणि पीडितेस पुढील तपासणी व कायदेशीर कार्यवाहीसाठी घनसावंगी पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आले आहे.
🎖️ यशस्वी पथकाचे अभिनंदन
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.
सदर कारवाईत अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे, पोउपनि रवींद्र जोशी, पोउपनि संजय गवळी, तसेच पोहेकॉ कृष्णा देठे, सागर बावीस्कर (स्थागुशा), महिला अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड आणि चालक संजय कुलकर्णी यांचा समावेश होता.



