सुनिल थोरात (हवेली)
पुणे : महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी तिस-यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा शपथबद्ध झाला.
नागपूरमधील राजभवन परिसरात तब्बल ३३ वर्षानंतर मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे. यावेळी भाजपाला मुख्यमंत्र्यांसह १९, शिवसेनेला उपमुख्यमंत्र्यांसह १२ आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्र्यांसह १० मंत्रीपदांसह ३९ मंत्री विधानसभा सभागृहात शपथ घेत आहेत.
पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या चार टर्मच्या आमदार माधुरी मिसाळ यांची महायुती मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी निवड झाली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विधानसभेच्या तिकीटाला भाजपमधून विरोध करण्यात आला होता. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी तो विश्वास सार्थ करत विजय मिळवला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, पर्वती मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले असून, भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या विरोधात यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अश्विनी कदम यांनी आव्हान निर्माण केले होते. येथे महायुती विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना होण्याऐवजी काँग्रेसचे आबा बागुल यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली. मात्र, मिसाळ यांनी तब्बल ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.
पुण्यातील पर्वती या भागातून १० वर्षे नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी आमदारकीची हॅट्रिक केली. पुणे भाजपमधील एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले सतिश धोंडिबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ या पत्नी आहेत.
राजकीय कारकीर्द…
-माधुरी मिसाळ यांनी कॉमर्समधून पदवी मिळवली आहे. त्यांनी २००७ पासून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर २००९ मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्या आमदार म्हणून निवडून आल्या.
-२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं वारं होतं. त्यावेळी माधुरी मिसाळ यांनी राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं होतं. त्या ७० हजारापेक्षा अधिक विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या.
-२०२७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी पवर्ती मतदारसंघातून तब्बल २२ नगरसेवक निवडून आणले आहेत.
-२०१९ मध्ये माधुरी मिसाळ या सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत प्रचंड विकास कामे असल्याने त्याचीच पोच पावती पक्षाने दिली असल्याचे बोलले जात आहे.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??