मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे (Government Scheme) पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात. कारण आता आधार नंबर (Aadhar Number) महत्वाचा मानला जातो.
त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
पण अनेकदा काही शेतकऱ्यांचे आधार बँकेला लिंक (bank Link Aadhar) नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे, हे लक्षात येत नसते. त्यामुळे आजच्या लेखातून तुमच्या आधार नंबरला नेमकी कोणती बँक लिंक आहे? हे तपासुयात…
कशी आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
सर्वप्रथम गुगलवर जाऊन https://www.npci.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
यानंतर आपल्यासमोर सहा पर्याय दिसतील यातील Consumer पर्यायावर क्लिक करा.
Consumer वर क्लिक केल्यानंतर पुन्हा अनेक पर्याय दिसतील.
यातील शेवटचा पर्याय असलेल्या Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) या पर्यायावर क्लिक करा.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
या नवीन इंटरफेसवर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा आहे, त्यावर क्लिक करा.
इथे क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील, यामध्ये तुम्हाला Aadhaar Mapped Status जो चार नंबरचा पर्याय आहे, तो निवडायचा आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे.
आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे.
त्यानंतर खाली दिलेल्या चेक स्टेटस पर्यायावर क्लिक करायचं आहे.
तसेच आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर आलेला ओटीपी ते टाकायचा. खाली सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे.
यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती दिसेल. यात आधार नंबर, मॅपिंग स्टेटस दिसत आहेत. तर सर्वात शेवटी बँकेची माहिती दिसेल. जर आपणास बँकेचे काही अपडेट दिसत नसतील तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडा.
तुम्हाला एक कार्ड दिल जाईल आणि त्यानंतर तुमचा अकाउंट आधार नंबरशी लिंक होईल.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??