अमळनेर सह खान्देश वासीयांना साहित्याची मेजवानी…
अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)आयोजीत खान्देशस्तरीय दोन दिवशीय नाट्य साहित्य संमेलन दि २९ व ३० सप्टेंबर रोजी येथील स्टेशन रोडवरील नविन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होत अाहे. या कार्यक्रमास प्रसिध्द सिने कलावंत जितेंद्र जोशी,लागीरं झालं जी फेम टिव्हि कलावंत विणा जामकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते “धग,” चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी पाटील आदि साहित्य व नाट्य क्षेत्रातील नामवंत मंडळी हजेरी लावणार आहे. अमळनेर सह खान्देश वासीयांना हि साहित्याची मेजवानी मिळणार असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू महाले सर व मसापचे पदाधिकारींनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले मसाप पुणे संस्थेने अमळनेरला संमेलन भरविण्याचा पहिला बहूमान दिला असून सूमारे ८० वर्षात प्रथमच खान्देशात हे संमेलन भरविण्यात येत आहे अमळनेर ला यापूर्वी जिल्हास्तरीय साहित्य संमेलन व बालनाट्य संमेलन यशस्वी झाल्यानेच हा सन्मान मिळाल्याचे संदिप घोरपडे यांनी यावेळी सांगीतले. नाट्यगृहाला पु.सानेगुरूजी नाट्य साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे कुठलेही नाटक असो वा चित्रपट किंवा सिरियल चे कथानक लिहिणारे हे साहित्यिकच असतात म्हणून नाट्य व साहित्य असे संयूक्त संमेलन प्रथमच भरविले जात आहे. या संमेलन यशस्वितेसाठी विविध समित्या कार्यरत असून जऴगांवचे जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे दि २९ रोजी सकाळी ८.१५वा सानेगुरूजी शाळेपासून ते नाट्यगृहा पर्यंत जाणाऱ्या युवारंग यात्राचे ऊदघाटन माजी आ साहेबराव पाटील व मुख्याधिकारी सौ शोभा बाविस्कर यांचे ऊपस्थीतीत पार पडेल.
यानंतर १०वा ग्रंथदालन व शस्र प्रदर्शनाचे नाट्यगृहाजवळ ऊदघाटन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाऴकर यांचे हस्ते होईल यावेळी प्रांत संजय गायकवाड व ऊपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख प्रमूख अतिथी राहातील १०. ३०वा युवा नाट्य साहित्य संमेलनाचे ऊदघाटन “धग” चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी पाटील यांचे हस्ते होईल या कार्यक्रमाला विशेष उपस्थीती लागीरं झालं जी ची कलावंत विणा जामकर यांची राहाणार आहे संमेलन अध्यक्ष जळगावचे रंगकर्मी हर्षल पाटील असून यावेळी आ.स्मिता वाघ,आ.शिरिष चौधरी, नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील, मसाप पुणे चे प्रा. मिलींद जोशी, प्रकाश पायगूडे,सौ सुनिता राजे पवार,प्रा तानसेन जगताप वि.दा. पिंगळे ऊपस्थित राहाणार आहे दुसऱ्या सत्रात दुपारी २ वा खान्देशच्या “रंगभुमिची सद्यस्थिती आणि भविष्य” या विषयावर दिड तासाचा परिसंवाद होईल त्या नंतर शिवाजी पाटील व विणा जामकर या रसिक प्रेक्षकांशी संवाद करतील या कार्यक्रमाचे निवेदक प्रा विनय जोशी असतील सायंकाळी ५ ते ९ परिवर्तन नाट्य संस्था जळगाव आयोजीत “जून जुलै”, मानवता बहूऊद्देशीय संस्था धुळे आयोजीत “ती सात वर्ष मतीमंद माणूसकी” व प्रताप महाविद्यालय व कलाविष्णू संस्था अमळनेर आयोजीत “रविपार” या तिन एकांकीका सादर होईल दुसऱ्या दिवशी दि ३०रोजी सकाळी ९वा कविसंमेलन त्यानंतर अहिराणी बोलीभाषेतील सादरीकरण व युवकांच्या भावविश्वातील नाट्य व साहित्य या विषयावर परिसवांद होईल दुपारच्या सत्रात सिने कलावंत जितेंद्र जोशी यांची प्रकट मूलाखत जेष्ट रंगकर्मी शंभू पाटील हे घेतील त्या नंतर समारोप व सत्कार समारंभाने नाट्य साहित्य संमेलनाची सांगता होईल या संमेलनाला साहित्य नाट्य रसिकांनी ऊपस्थीती द्यावी असे आवाहन स्वागताध्यक्ष डिगंबर (राजू) महाले संदिप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, रमेश पवार, शरद सोनवणे दिलीप सोनवणे दिनेश नाईक भाऊसाहेब देशमूख व मसाप शाखा अमळनेर पदाधिकारी यांनी केले आहे.