पाणंद रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार, पारधला आमदार संतोष दानवे यांचे आश्वासन
By तेजराव दांडगे
पाणंद रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार, पारधला आमदार संतोष दानवे यांचे आश्वासन
पारध, दि. 21: पारध, पिंपळगाव रेणुकाईसह आदी गावांसह परिसरातील गावं माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे असून या गावांच्या विकासासाठी मी कायम कटिबध्द राहील असे उदगार आ. संतोष दानवे यांनी पारध बु. येथे आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना काढले.
यावेळी पुढे बोलताना आ. दानवे म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील पाणंदरस्ते, पारध ते धामणगाव रस्ता, पारध ते पारध खुर्द या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून गावात काय विकास कामे पाहिजे ते मला हक्काने सांगा. येथील सर्व जाती धर्माच्या वतीने आ. संतोष दानवे यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केल्या बद्दल जाहीर नागरी सत्कार आणि संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्ती प्राण देताना आ. दानवे बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती परमेश्वर लोखंडे यांनी केले तर महेंद्र लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजयुमो चे पदाधिकारी देवेंद्र लोखंडे, पवन लोखंडे, सामाजिक

यावेळी तालुकाध्यक्ष कौतिक जगताप, माजी जि.प. सदस्य सुभाष देशमुख, माजी सभापती गणेश ठाले, गणेश लोखंडे, रामेश्वर कारखान्याचे संचालक संजय लोखंडे, मोतीराम नरवाडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, दिलीप बेराड सुखलाल बोडखे आदीची उपस्थिती होती.