अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये आर.पि.आय.शाखांचे उदघाटन….
अमळनेर– तालुक्यातील मुंगसे,सवखेडा,नगावं या ठिकाणी आर.पि.आय. चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या शुभहस्ते आर.पि.आय.शाखांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.फलक अनावरण प्रसंगी आर.पी।आय.चे खान्देश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण भाऊ जाधव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, आर.पी.आय.युवा जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे,रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख सुधामभाई सोनवणे,जळगाव विभागीय अध्यक्ष दिपकभाऊ सपकाळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आर.पी.आय.अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत भाऊ बैसाने ह्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सादर शाखांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.दरम्यान आर.पी.आय.उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे फलक अनावरण प्रसंगी बोलताना म्हणाले की,ही शाखा एका समाजापुरती मर्यादित न ठेवता बहुजन समाजाच्या हितासाठी कार्यान्वित करा.असे प्रतिपादन केले.येत्या 25 तारखेला जळगाव येथे रामदासजी आठवले साहेबांच्या सभेला किमान ५ ते ६ हजार संख्येत जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सूर्यवंशी यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत आर.पी.आय.तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने यांनी जलगाव येथील सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आर.पी.आय.युवा तालुका अध्यक्ष दाजीबा गव्हाणे यांनी पार पाडले.
शिवाय प्रमुख अथीतींसह आर.पी.आय.चे जेष्टनेते रमेश दादा शिरसाठ,विधानसभा क्षेत्रप्रमुख श्यामभाऊ संदनशिव,जिल्हाउपाध्यक्ष दिनेशजी बिऱ्हाडे,तालुका उपाध्यक्ष पोपट निकम ,झेंडू निकम,पंडित अहिरे,बापू जयराम अहिरे,सामाजिक कार्यकर्ते आत्माराम अहिरे, संजय अहिरे,अनिल नेरकर,प्रवीण नेरकर,भोमा बिऱ्हाडे, लक्ष्मण बिऱ्हाडे, नितीन मैराळे, शांताराम गोबा पाटिल,दीपक सैंदाने,प्रमोद बैसाने(रणाईचे) यांची उपस्थिती होती.