जनता विद्यालयात आनंदनगरी उत्साहात साजरी, दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचाही केला सन्मान
By तेजराव दांडगे
जनता विद्यालयात आनंदनगरी उत्साहात साजरी, दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचाही केला सन्मान
पारध (प्रतिनिधी):भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यात विद्यार्थ्यांनी १५ स्टॉल उभारले होते. त्यातून विद्यार्थ्यांनी २० हजार रुपयांची उलाढाल केली.
संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे यांच्या हस्ते या आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे,पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे,एस.एस.खोडके, प्रा.संग्रामराजे देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी दर्पण दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाऊंची खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. दैनंदिन शैक्षणिक जीवनात अभ्यासाला जेवढे आपण जास्त महत्त्व देत असतो तेवढेच महत्त्व अन्य कला, क्रीडा, व्यायाम, आहार यांनाही दिलेपाहिजे. याच गोष्टीचा विचार करून मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत ‘आनंदनगरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे यावेळी संस्थेचे सचिव उदयसिंह लोखंडे म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे, पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे प्रा. संग्राम राजे देशमुख, एस एस खोडके, आर ए देशमुख ,विजया कदम ,मृदुला काळे ,लता वानखेडे, ए.टी. सोनुने , प्रा.एस.एन. पायघन, प्रा.विनोद सोनगिरे, शैलेंद्र बैस, बंकिमचंद्र लोखंडे यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांचा सन्मान
यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून दर्पण दीन साजरा करण्यात आला.संस्थेच्या वतीने स्थानिक पत्रकार गजानन देशमुख,रामसिंग ठाकूर,रमेश जाधव,शेख शकील,समाधान तेलंग्रे, सागर देशमुख आदींचा शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.